7
आरती ओवाळू माझ्या सद्गुरू नाथा | भावे चरण कमलां वरी ठेविला माथा ||धृ ||
सगुण आरती आता निर्गुण ओवाळू | कल्पनेचें धृत घालूनी दीप पांजळू –||१||
अविधेचे मुळ परतें उपडोनी सांडू | आशा मनशा तृष्णा काम क्रोध कुर्वंडू— ||२||
सद्गुरूंचे पूजन केले षोडशोपचारी | रामानंद जीवनमुक्त झाला संसारी–||३|| ओवाळू आरती …
7