12
जयदेव जयदेव जय आत्मारामा | निगमागम शोधीत न कळे गुण सीमा || धृ ||
नाना देही देव एक विराजे | नाना नाटक लीला सुंदर रूप साजे |
नाना तीर्थ्री क्षेत्री अभिनव गती माजे | अगाध महिमा पिंड ब्रम्हांडी गाजे ||१||
बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा | हरिहर ब्रह्मादीक देव सकळाचा |
युगायुगानि आत्माराम आमुचा | दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ||२||
12












