पाकिस्तानातील भोजा एअरलाईन्सचे एक प्रवासी विमान इस्लामाबाद येथील चकाला विमानतळाजवळ कोसळले असून, विमानातील ११८ प्रवासी ठार झाल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे. या अपघातानंतर रावळपिंडी व इस्लामाबाद येथे आणीबाणी जारी करण्यात आली आहे.
नागरी उड्डयन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बोईंग ७३७ प्रकारच्या कराचीहून निघालेल्या या विमानात १२७ प्रवासी होते. विमान इस्लामाबादला निघाले होते. विमान कोसळले तेव्हा इस्लामाबाद शहरात चक्रीवादळ सुरू होते,जोरदार पाऊस पडत होता. वीज कोसळल्यामुळे विमानाला आग लागली असावी. विमान कोसळताच त्याला आग लागली असून, विमानाचे अवशेष अजूनही धुमसत आहेत.
Source :
Online