जन्मापासून एक दीड वर्षाचे होईपर्यंत बाळाला आईच्या दुधाची आवश्यकता असते. बाळंतपणानंतर पान्हा फुटणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरीही काही महिन्यानंतर आईला पुरेसे दुध येत नाही. बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे दुध एक दीड वर्षापर्यंत व्यवस्तीत येण्यासाठी आहारात काही गोष्टींची आवर्जून समावेश करावा. रोजच्या जेवणात अळूची, मेथीची आणि इतर पालेभाज्यांचा समावेश असावा. शक्यतो या भाज्यांमध्ये भाकरी कुस्करून खावी. अड्लीवाचा लाडू किंवा खीर खावी. गुळ घालून ओल्या खोब्राचे कपभर दुध प्यावे.
रोज एक खोब्राचा तुकडा खावा. सकाळ-संध्याकाळ दुध प्यावे. दुधामध्ये अश्वगंद, शतावरी, यांच्या भुकटीचा समावेश करावा. या बरोबरच खजूर-खोबरे किंवा खारीक-खोबरे यांचा कीस करून ही भुकटी साजूक तुपावर परतावी आणि रोज तीन-चार चमचे खावी. पोळीवर, भातावर साजूक तुपाची धार घ्यावी. कोरडे अन्न खाण्याऐवजी भाजीच्या रश्यात किंवा दुधात पोळी, भाकरी कुस्करून खावी. लोणी, खडीसाखर एकत्र करून खावी. त्याचबरोबर गुळवेलही दुधाबरोबर घ्यावे. तसेच गायीच्या दुधात भात शिजवून खाल्ल्यास फायदा होतो. मातेने वाताचा त्रास होऊ नये म्हणून कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर चमचाभर ओवा, शोपा यांची भुकटी खावी.
Leave a Reply