चौथा कोपरा!




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Fourth-Side-Of-Mind, It’s innovative, enjoyable, mind-blowing, captivating, and beautiful in every way. The 3D effects are also seamlessly combined into the animation unlike any …

fourth side of mind  ज्यांनी ४७ वर्ष सुखात ठेवले, हसत ठेवले, त्यांना मी रडत बसलेले आवडेल  का? माझ्या दु:ख उगाळन्याने मुलांच्या संसारातील आनंद का म्हणून हिसकावून घ्यायचा! म्हणून मनातल्या मनात रात्री आपल्या खोलीत आठवनी काढून  दु:खाची वाट मोकळी करून घ्यायची! प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम ह्यांच्या भाषेतला चौथा कमरा (मनातच) तयार केलाय. आनंदाचा हसरा मुखवट घालून दिवसभर वावरते.

आपली अडचण घरातल्यांना होणार नाही, याची काळजी घेत माझे रुटीन सुरु केले आहे! स्वतः ला समवयस्क ग्रुप मध्ये गुंतावूनच घेतले आहे! घरात जरी काही झाले तरी डायरीत लिहून ठेवते. डायरी ही आपली सखीच असते!
सदेंव कोणाच्या नातीचे लग्न, नातवांच्या मुंजी, नातींचे वाढदिवस, लग्न, कोणाच्या ६५ चा समारंभ! अशा वेळेस मी स्वतः लिहून सुभेच्या देते! मुंज म्हणजे कोणते संस्कार, भिक्षावळ, उखानेही लिहून देते! त्यांना आनंद होतो अ मलाही होतो.

छोट्या- छोट्या गोस्तीतून आनंद घ्यावा व द्यावा! माझ्या बगीच्यातील फुले रोज दोन-तीन जणांना देते! लहान मुलांना गोष्टी सांगणे, मनाचे श्लोक, शुभंकरोती इत्यादी शिकवते आणि दिवाळीत तर ४० -५० जणांना स्वतः च्या हाताने लिहून सुभेच्या देते! झेरोक्ष करीत नाही! प्रतेक्काच्या अंगात काही न काही गुण असतातच, म्हणून सांगते की आली घडी आनंदाने साजरी करावी .

– रजनी संत.
नागपूर.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu