देवानंद यांचा परिचय
Like
Like Love Haha Wow Sad Angry
dev anandji
पंजाबमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यात २६ सप्टेंबर १९२३ रोजी जन्मलेल्या देवानंद यांचे मूळ नाव देवदत्त पिशोरीमल आनंद असे होते. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. लाहोरच्या प्रसिद्ध सरकारी कॉलेजमध्ये १९४२ मध्ये इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन केले. याच कॉलेजमध्ये त्यांची ओळख बलराज साहनी, बी. आर. चोपडा, आणि खुशवंत सिंह या भविष्यात खूप मोठ्या झालेल्या व्यक्तींशी झाली.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लष्कराच्या सेन्सॉर ऑफिसमध्ये कारकून पदावर नोकरी सुरू केली. सैनिक आणि त्यांचे नातलग यांच्यातील पत्रव्यवहार तपासणे आणि पत्र योग्य पत्त्यावर लवकर पोहोचवण्याची व्यवस्था करणे हे त्यांचे काम होते. अल्पावधीतच नोकरी सोडून त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला.

प्रभात कंपनीच्या हम एक है मधून चित्रपट सृष्टीतली कारकिर्द सुरू करणा-या देवानंद यांना आधी मोठे अपयश पचवावे लागले. हम एक है आपटला. पुढे देवानंद यांच्याच नवकेतन कंपनीचा अफसर हा चित्रपट देखील पडला. पण या अपयशाने न डगमगता चित्रपट सृष्टीत पाय रोवून उभ्या राहिलेल्या देवानंद यांचा बाजी हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. त्यानंतर उत्तरोत्तर देवानंद यांनी अनेक छान चित्रपट दिले.

हम एक है, अफसर, बाजी, मुनीम जी, दुश्मन, कालाबाजार, सी. आय. डी., पेइंग गेस्ट, गॅम्बलर, तेरे घर के सामने, काला पानी, जाल, गाइड, तेरे मेरे सपने, छुपा रुस्तम, हरे रामा हरे कृष्णा, हिरा पन्ना, देश परदेस, लूटमार, स्वामी दादा, सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर, हम दोनो आणि ज्वेल थीफ हे देवानंद यांचे निवडक चित्रपट कायमच चर्चेचा विषय राहिले.

देवानंद यांची हम एक है चित्रपटाचे काम सुरू असतानाच गुरुदत्त यांच्याशी एक कॅमेरामन म्हणून ओळख झाली होती. पुढे ज्येष्ठ बंधू चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केलेला अफसर चित्रपट पडल्यावर देवानंद यांनी गुरुदत्त यांनाच दिग्दर्शकाच्या भूमिकेत आणले. नवकेतन कंपनीसाठी गुरुदत्त यांनी बाजी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा सिनेमा हिट झाला. त्यानंतर गुरुदत्त यांनीच देवानंदसाठी जाल चित्रपटाचे दिग्दर्शन केले. जाल चित्रपटानंतर मात्र गुरुदत्त यांनी फक्त स्वतःच्या कंपनीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि देवानंद यांच्या नवकेतन कंपनीच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विजय आनंद यांच्याकडे आली. देवानंद यांचे धाकटे बंधू विजय आनंद यांनी काला बाजार, तेरे घर के सामने, छुपा रुस्तम या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. याच काळात देवानंद आणि सुरय्या विवाहाची चर्चा सुरू झाली.

चित्रपट सृष्टीत वावरणा-या देवानंद यांनी अभिनय आणि चित्रपट निर्मिती सोबतच पटकथा लेखन करण्याचाही प्रयोग केला . आंधिया , हरे रामा हरे कृष्णा , हम नौजवान , अव्वल नंबर , प्यार का तराना , गँगस्टर , मै सोलह बरस का , सेन्सॉर या चित्रपटांसाठी देवानंद यांनीच पटकथालेखन केले . हिरा पन्ना, देश परदेस, लूटमार, स्वामी दादा, सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर अशा निवडक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले.

देवानंदचे खासगी जीवन
अफसरच्या निमित्ताने देवानंद-सुरय्या जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसली होती. तेव्हापासूनच देवानंद सुरय्याच्या प्रेमात होते. पुढे एका शूटिंगच्या वेळी नाव उलटली त्यावेळी देवानंद यांनी बुडणा-या सुरय्या यांना वाचवले होते. त्यामुळे आता लवकरच विवाह सोहळा होणार असे वाटत होते. पण सुरय्या आजीने तीव्र विरोध केल्यामुळे हे लग्न झाले नाही. अखेर देवानंद १९५४ मध्ये चित्रपट अभिनेत्री कल्पना कार्तिक हिच्याशी विवाहबद्ध झाले. सुनीलच्या जन्मानंतर काही काळाने देवानंद पुन्हा चित्रपटसृष्टीत रमला आणि कार्तिकने एकाकी राहणे पसंत केले. अलिकडे देवानंद यांनी सुनीलला चित्रपट सृष्टीत आणण्याचा प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नाला विशेष यश मिळाले नाही.

देवानंद आणि नव्या अभिनेत्री
देवानंद यांनी अनेक नव्या अभिनेत्रींना चित्रपटसृष्टीत आणले . हरे रामा हरे कृष्णा मधून झीनत अमान चित्रपटसृष्टीत आली . टीना मुनीम , नताशा सिन्हा , एकता यांना देखील देवानंद यांनी चित्रपटसृष्टीचे द्वार खुले करुन दिले .

देवानंद यांना मिळालेले पुरस्कार
दादासाहेब फाळके पुरस्कार – २००२
पद्मभूषण पुरस्कार – २००१
गाइड सिनेमासाठी बेस्ट अॅक्टर, फिल्मफेअर पुरस्कार – १९६५
काला पाला सिनेमासाठी बेस्ट अॅक्टर, फिल्मफेअर पुरस्कार – १९५०

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu