IIShri MahaLaxmi AartiII II श्री महालक्ष्मीची आरती II
श्री महालक्ष्मीची आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥ करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता । पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता । । कमलाकारें जठरी जन्मविला धाता । सहस्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां । । १ । । जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥ मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं । झळके हाटक-वाटी पीयुषरसपाणी ॥ माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी । शशिकरवदना राजस मदनाची जननी । । २ । । जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥
ताराशक्ति अगम्या शिवभजकां गौरी । सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारीं । । गायत्री निजबीजा निगमागम सारी । प्रकटे पद्मावती निजधर्माचारी । । ३ । । जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥
अमृतभरिते सरिते अधदुरिते वारीं । मारीं दुर्घट असुरां भव दुस्तर तारी । । वारीं मायापटल प्रणमत परिवारी । हें रूप चिद्रुप तद्रुप दावीं निर्धारीं । । ४ । । जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥
चतुरानने कुश्चित कर्माच्या ओळी । लिहिल्या असतील माते माझे निजभाळी । । पुसोनी चरणतळीं पदसुमनें क्षाळी । मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी । । ५ । । जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥
आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.
खालील बटण लाइक आणि शेअर करा
Loading Comments...
%d
तुमचा अनुभव सुधारण्यासाठी ही वेबसाइट कुकीज वापरते. आपण ही साइट वापरणे सुरू ठेवल्यास, आपण त्यास सहमती देता.