खाण्या-पिण्यच्या चुकीच्या सवयी वेळ-अवेळ तळलेले मसालेदार पदार्थ, अतिगोड खाणे यामुळे शरीरात अनेक प्रकारचे विषारी पदार्थ तयार होतात. वैद्यकीय परिभाषेत टॉक्सिन म्हणून ओळखले जाणारे हे पदार्थ वर्षानुवर्ष शरीरात साठून राहतात. ते शरीरातून वेळीच बाहेर काढले नाहीतर अनेक रोगांना निमंत्रण मिळते. अशी विषारी द्रव्ये शरीरातून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला निर्विषीकरण असे म्हटले जाते. यामुळे शरीरातिल अप्चनसंस्था स्वच्छ शुद्ध होत असते.
पचन संस्था शुद्ध करण्याचा सर्वात चांगला मार्ग ‘फलाहार’ आहे म्हणजेच संपूर्ण दिवस फळांचे सेवन करणे. कोणतेही दोन दिवस सातत्याने हा उपचार करावा लागतो. या दोन दिवसात आवडीचे कोणतेही एक फळ ठरवा. केळी, सफरचंद, द्राक्ष, अननस, कलिंगड असे कोणतेही फळ ऋतुमानानुसार ठरवा. दोन दिवस हेच फळ व पाणी असा आहार ठेवा. दोन्ही दिवस एकच फळ खा. चहा-कॉफी यांचेही सेवन करू नक. चहाची अगदीच तल्लफ आली तर गवती चहात मध टाकून घ्या.
या दोन दिवसात खूप भुक लागली असे वाटेल. पण त्यावर नियंत्रण ठेवा. फळे लवकर पचतात, त्यामुळे असे होते.
या काळात हलका फुलका व्यायाम करा. अधिक परिश्रमाचे काम करु नका. भरपूर आराम करा. या प्रक्रियेनंतर खूप हलके वाटेल. वजनही कमी होईल. पण यासाठी दोन दिवस आराम करण्यासारखा वेळ हाताशी पाहिजे. तसेच प्रकृतीची कोणतीही तक्रार असणाऱ्यांनी हे करण्यापूर्वी वैद्यकीय सल्लाही घेतला पाहिजे.
Read More Articles on : Marathi Mati (www.marathimati.com)