एक आवड नवी दिशा आणि पाया रचणारी अशी लेखन कथा यावर खूप प्रेम करते.
आजची स्त्री म्हणजे सामाजिक व सार्वजनिक कर्तृत्व पार पडणारी.स्त्रियांची दुहेरी जबाबदारी एक घरची व एक बाहेरची जबाबदारी.सामान नागरिकत्व सामान कायदा असणारी. वडिलांच्या संपत्ती मध्ये वाटा असणारी.कुटुंबामध्ये प्रथम दर्जा असणारी.व बाहेर लेडीस फर्स्ट असणारी ,तर वडिलांची आवडती गोंडस परी असणारी.अशी हि आजची स्त्री आहे.
आजचा स्त्री ला सामान दर्जा दिला आहे.खूप अगोदर स्त्रीला चूल आणि मूल एवढच माहित होत,समाजात स्त्रियांना मुलं सांभाळणे आणि घर संभाळणे एवढच दर्जा होता,आता सामान दर्जा दिला आहे बरोबरीचा हक्क दिला आहे.शिवाय आजची स्त्री हि चूल-मूल आणि शिक्षण तसेच नौकरी आणि घरचा जबाबदाऱ्या हि सांभाळते.आवड म्हणून सर्व गोष्टी जपते,आजची स्त्री खूप पुढे गेली आहे.सावित्रीबाई फुले या समाजसुधारक होत्या,त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.त्या शिक्षिका होत्या,तर आजची स्त्री शिक्षिका आहे,सावित्रीबाई फुले या कवियत्री होत्या,तर आजची स्त्री कवियत्री सुद्धा आहे.आजची स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे.
काही मुली आज दत्तक घेतल्या जातात.काही कुटुंब असेही आहेत कि मुलींना दत्तक घेऊन त्यांना आपलंस करतात.त्यांचं पालन-पोषण करतात.आजकाल स्त्रीच्या शिक्षणासाठी कर्ज देखील देतात.काही काळा आदी मुलींना शिक्षण दिले जात न्हवते,का तर मूल आणि चूल एवढच होतं तिच्या पदरी.अशी मानसिकता विकसित झाली होती.तेव्हा स्त्री जातील घरातून बाहेर पडू देत नसे.पदरा आड ठेवले जात असे.अत्याचार सहन करावे लागत असे.खूप आदी मुलीचा घरचे पाणी पिणे हि वर्ज्य मानले जात असे.आज कालची स्त्री या जगात आजही असुरक्षित आहे.तिला स्वतःच्या संरक्षणासाठी काही तरी मार्ग तिने शोधला पाहिजेल,आजकाल स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार ,बलात्कार होत आहेत.स्त्री ने स्वताः मध्ये धाडसी पणाची वृत्ती जागी केली पाहिजे.स्त्रीच जीवन हे काचेच्या भांडयासारखं असतं.पडलं कि फुटतं.या गोष्टींमुळे स्त्रियांनी खूप आत्मविश्वास मनात निर्माण करावा,जेणे करून समोर आलेले संकट ती बिनधास्त पार करू शकेल.तरी स्त्री शक्ती जागी होण्यासाठी तिला सर्व गोष्टींना सहन करायची ताकद हवी.
काही गोष्टी अशा असतात स्त्रिया आतून तुटून जातात,आजही सुरक्षिततेमध्ये तिची व्यवस्था कमी आहे.काही गोष्टी आपल्या हातात नसतात.तरीही तिने स्वतःच्या संरक्षणासाठी खूप गोष्टींचा अनुभव तसेच काही गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे. आपण सुरक्षित कसे राहू याचा विचार करावा.तसेच लोकांना दाखवून दिले पाहिजे स्त्री स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते.आजची स्त्री वेगवेगळ्या नात्यात एकरूपता आणते.प्रत्येक स्त्रीला अभिमान वाटला पाहिजे स्त्री असल्याचा.आजही स्त्री शक्तींना व तिच्या गुणांना वाव मिळत आहे.त्यामुळे स्त्रियांनी जगाला सिद्ध करून दाखवावे कि ती एकटी नाही तिच्या सोबत तिचा आत्मविश्वास आहे.स्त्री हि फक्त स्त्री नसून देवीचा अवतार आहे.ती प्रत्येक अवतारात रूप बदलते,कधी मुलगी होऊन आई -वडिलांना सांभाळते,तर कधी सून म्हणून सासू-सासरे व कुटुंबाला जपते, तर कधी आई म्हणून मुलांचे संगोपन शिक्षण तसेच नवऱ्याचे कर्तव्य अशा गोष्टी पार पाडते.अशा अनेक रूपांनी ती सजली आहे.म्हणतात ना प्रत्येक पुरुष मागे एक स्त्री असते,तसेच प्रत्येक स्त्री मागे पुरुष व कुटूंब असायला हवे.
माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.जिजाऊ खरोखर आदर्श माता आहे. आपल्या मुलांना धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचा सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असतं. स्त्रीने आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे.अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर अशी ख्याती असणा-या कल्पना चावला.हि सुद्धा एक स्त्री असून तिने स्वतःला सिद्ध केले.
स्त्री हि फक्त स्त्री नसून एक शक्ती आहे.आज पुरुषांच्या बरोबरीने पुढे जाणारी स्त्री अनेक संकटांना सुद्धा सामोरे जातेय, समाजाने सुद्धा ह्या सर्वात तिची साथ दिली पाहिजे. कारण जेव्हा स्त्री जन्माला येईल तेव्हाच तिच्या गर्भातून समाज जन्म घेईल !
लेखिका – तेजश्री गणेश शिंदे-कांबळे
tejashreekamble801@gmail.com