मेथी पराठा




मेथी पराठा हा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणा-या काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ मेथी पराठा मेथीच्या भाजीची काही पाने, गव्हाचं पीठ, हिरव्या मिरच्या, दही इतक्या कमी सामग्रीमध्ये बनणारी सोपी पाककृती आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तसंच हेल्दी रेसिपीचा ऑप्शन शोधत असाल तर मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे. ब्रेकफास्ट शिवाय मेथीचा पराठा तुम्ही डब्यातही पॅक करून मुलांना किंवा घरातील इतर सदस्यांना देऊ शकता. तर मंडळी वाट कसली बघताय? चला तर पाहुयात मेथी पराठ्याची चविष्ट आणि झट की पट होणारी साधीसोपी रेसिपी
मेथी पराठा

महत्त्वाची सामग्री

  • 1 कप गव्हाचे पीठ
  • 1 कप मेथीची पाने
  • 3.4 कप योगर्ट
  • 2 चमचे लसूूण पेस्ट
  • 1 चमचे साखर
  • 1 चमचे कॅरम सीड
  • 1 चमचे तीळ
  • 1 चमचे तूप
  • आवश्यकतेनुसार हळद
  • 2 चमचे मिरची पावडर
  • आवश्यकतेनुसार मीठ

कृती
एका बाऊलमध्ये १ वाटी गव्हाचं कणिक आणि १ वाटी मेथीची पानं घेऊन व्यवस्थित मिक्स करा. या मिश्रणात १ चमचा ओवा, १ चमचा तीळ, ३ चमचे लसणाची पेस्ट, चिमुटभर हळद, १ चमचा लाल तिखट पावडर टाकून सर्व सामग्री चांगली मिक्स करुन घ्या.पीठात साखर, मीठ आणि अर्धा कप दही टाकून मिश्रण एकजीव करा या पीठात साखर, मीठ आणि अर्धा कप दही टाकून मिश्रण एकजीव करा. हा पीठाचा गोळा थोडंसं तेल घालून चांगला मळून घ्या. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मऊ होईपर्यंत चांगलं मळून घ्या.कणिकेला पराठ्यासारखा गोल आकार द्या पीठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या आणि त्या प्रत्येक गोळ्याला पराठ्यासारखा गोल आकार द्या.पराठा दोन्ही बाजूंनी चांगला खुसखुशीत भाजून घ्या तवा गरम करुन त्यावर पराठा दोन्ही बाजूंनी चांगला खुसखुशीत भाजून घ्या. पराठा भाजताना त्यावर आपल्या आवडीनुसार तेल किंवा साजूक तूप घाला.तयार झाले आपले गरमा गरम, खमंग आणि पौष्टिक असे मेथीचे पराठे. अशारितीने तयार झाले आपले गरमा गरम, खमंग आणि पौष्टिक असे मेथीचे पराठे! या मेथी पराठ्यांचा तुम्ही सकाळी व संध्याकाळी चहा किंवा कॉफीसोबत आस्वाद घेऊ शकता. हे पराठे तुम्ही दही, सॉस किंवा हिरव्या चटणीसोबतही खाऊ

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड