Bail Pola Wishes, Thoughts In Marathi
पोळा हा बैल आणि बैलांचा सन्मान करणारा सण आहे जो महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक येथील शेतकरी साजरा करतात. पोळा हा शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचा त्यांच्या बैलांबद्दल आभार मानणारा सण आहे. या राज्यांमध्ये बैल आणि बैलांचे महत्त्व ओळखण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो, जे शेती आणि शेतीच्या कामाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत.
Bail Pola Wishes : बैल पोळा फोटो शुभेच्छा
बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
जसे दिव्याविना वातीला
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय
तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा
दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देणं
बैला खरा तुझा सण
शेतक-या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा
सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा