हिवाळ्यातील पौष्टिक लाडूंचे प्रकार आणि फायदे
प्राचीन काळापासून भारतात विविध पौष्टिक पदार्थांचा समावेश आहे त्यातच लाडू हे जगप्रसिद्ध पदार्थ आहे. आपल्यापैकी काही लाडू प्रेमी नक्कीच असतील त्यामुळे मी आपल्यासाठी विविध प्रकारचे लाडू घेऊन आलोय ज्यांची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.भारतीय संस्कृती नुसार लाडूंचे विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे तुम्हाला भारताच्या प्रत्येक भागात वेगवेगळे लाडू खायला मिळतात.लाडू म्हटले की आपल्या मनात आधी मिठाई, गोड असे येत असेल परंतु काय आपल्याला माहितीये की प्राचीन काळात लाडूचा औषधी म्हणून वापर केला जायचा जसे लाडूत औषध टाकून खाऊ घालने. आजही लाडू पौष्टिक आणि निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. आणि खाली दिलेले सर्व लाडू आपल्याला निरोगी फायदे देतील.
हिवाळ्यातील पौष्टिक लाडूंचे प्रकार :Types Of Laddu In Marathi
मेथीचे लाडू
हिवाळा आला की मेथीचे लाडू लगेच आठवतात कारण हिवाळ्यात मेथीचे लाडू खाण्याची मज्जाच वेगळी असते. मेथीचे लाडू चवीत गोड आणि कडू असतात कारण मेथी ही कडू असते.
मेथीचे लाडू करतांना मेथिला बारीक दळून घेतात आणि पीठ, डिंक, बदाम, काजू, मनुखे, खोबऱ्याचे किस, तूप, गुड असे वस्तू घेतात. मेथीचे लाडू जास्त गोड ही नसावे कारण त्यामुळे मेथीचा स्वाद च जातो आणि लाडू मेथीचे आहेत असे वाटतच नाही.
फायदे
1)मेथीचे लाडू सर्दी मध्ये जास्त गुणकारी असतात त्यामुळे त्यांना जास्तकरून हिवाळ्यात बनवले जातात.
मेथी मध्ये फायबर असतात ज्यामुळे सुगर कमी होते त्यामुळे हे डायबिटीस ज्या रुग्णांसाठी फायदेमंद असतात.
2)जर आपण मेथीच्या लाडूंना योग्य प्रमाणात खाल्ले तर आपली अतिरिक्त चरबी कमी होते कारण मेथी मुळे आपली पचन क्रिया सुधारते.
मेथीचे लाडू आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप गुणकारी आहेत याच्याने आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहील.
3)मेथीचे लाडू कॅन्सर आजारावर गुणकारी आहे.
ह्या लाडूमुळे आपले केस निरोगी राहतील.
4)मेथीचे लाडू कब्ज आजारावर खूप गुणकारी आहे कारण मेथी मुळे आपली पचन क्रिया सुरळीत होते.
उडीद डाळचे लाडू
हिवाळ्यात उडीद डाळचे लाडू सुद्धा खूप पसंद केले जातात कारण हे पौष्टिक असून स्वादिष्ट देखील असतात. उडीद डाळ चे लाडू तरुण मुलांसाठी खूप फायदेमंद असतात कारण उडीद डाळ मुळे हाड आणि संपूर्ण शरीर निरोगी होते.
उडीद डाळ चे लाडू करण्यासाठी उडीद डाळ, गुड, तूप, काजू, बदाम, पिस्ता, मणुखे, खोबऱ्याचे किस, ई साहित्य लागतात.
फायदे
1)उडीद डाळ शरीर मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे, त्याच्यामुळे आपले हाड मजबूत होतात.
2)उडीद डाळ च्या लाडू मुळे स्नायू मजबूत होतात.
3)उडीद डाळीचे लाडू त्वचेसाठी फायदेमंद असतात यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग कमी होतात.
4)उडीद डाळ मुळे रक्तभिसरण सुरळीत होते आणि हृदय सुद्धा चांगले राहते.
5)उडीद डाळीचे लाडू पोटाच्या समस्यांना दूर करतात.
मूग डाळचे लाडू
मूग डाळीचे लाडू हिवाळ्यातच नाही तर अन्य ऋतुंमध्ये सुद्धा बनवले जातात. उडीद डाळ शरीरासाठी चांगली असते त्यामुळे तिचे लाडू खायला हवे. मुगाचे लाडू हे पिवळे रंगाचे असतात कारण मुगाची डाळ देखील पिवळी असते.
मुगाचे लाडू करण्यासाठी आपल्याला मूग डाळ, तूप, पिठी साखर, काजू, बदाम, पिस्ता, इलायची हे साहित्य लागतील.
फायदे
1)मूग डाळ प्रथिने युक्त म्हणजेच प्रोटीन ने भरपूर असते ज्यामुळे शरीर निरोगी आणि मजबूत होते.
2)मूग डाळ ताप मध्ये खूप गुणकारी असते त्यामुळे ज्यांना सतत ताप येतो त्यांनी मुगाचे डाळीचे लाडू घातला हवे.
3)मुगाची डाळ तब्येत बिघडल्यानंतर कमजोरी दूर करण्यासाठी फायदेमंद आहे.
4)मुगाचे डाळीचे लाडू हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेमंद आहे.
गुड तेलचे लाडू
तुम्ही कदाचितच गुड तेलचे लाडू एकले असतील कारण हे लाडू जास्त करून खान्देशात प्रसिद्ध आहेत. खान्देशात हे लाडू आपल्याला घरोघरी दिसतील. गुड तेल च्या लाडूला गहू गुळाचे लाडू देखील म्हणतात.
गुड तेल चे लाडू करण्यासाठी गुड, गहू चे पीठ, रवा, तेल, खोबऱ्याचे किस, काजू, बदाम, पिस्ता, मनुके हे साहित्य लागतील.
फायदे
1)गुड तेलचे लाडू पचन क्रिया सुरळीत करण्यासाठी खूप फायदेमंद आहेत.
2)गुड तेलचे लाडू वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.
3)हे लाडू रक्त भिसरण सुरळीत करते.
4)गुडमुळे शरीर आतून साफ होते आणि सर्व घाण बाहेर निघते.
बेसन लाडू
बेसन चे लाडू आपण खाल्लेच असतील कारण हे खूप चविष्ट असतात. बेसन चे लाडू मऊ असल्यामुळे खाण्यास छान वाटतात. बेसन के लड्डू अप्रतिम असतात आणि त्यांची चव माव्या सारखीच लागते.
बेसन चे लाडू करण्यासाठी बेसन पीठ, तूप किंवा तेल, पिठी साखर, काजू, बदाम, पिस्ता, इलायची हे साहित्य लागतात.
फायदे
1)बेसनाचे लाडू खूप चविष्ट आणि पौष्टिक असतात त्यामुळे खाण्यास गोडी येते.
2)लाडू मध्ये साखर कमी टाकल्यास शुगर च्या रुग्णांसाठी देखील गुणकारी आहे.
3)बेसन चे लाडू वजन कमी करण्यात व नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहेत.
4)बेसन त्वचेसाठी खूप फायदेमंद असतात त्यामुळे त्याचे लाडू सुद्धा खायला हवे.
गहू पिठाचे लाडू
गहू पिठाचे लाडू सुद्धा खान्देशात खूप प्रसिद्ध आहेत आणि इथे आपल्याला हे लाडू दिवाळीला आणि हिवाळ्यात घरोघरी दिसतील. आतापर्यंत आपण गहूच्या पिठाचे चपाती ऐकली असेल परंतु गहुचे लाडू सुद्धा तयार केले जातात.
गहू पिठाचे लाडू तयार करण्यासाठी गहुचे पीठ, पिठी साखर, तूप, काजू, बदाम, ई साहित्य लागतात.
फायदे
1)गव्हाचे लाडू पौष्टिक आणि चविष्ट असतात.
2)गहू च्या पिठाचे लाडू गुडघे दुखी, सांधे दुखी मध्ये गुणकारी साबित होतात.
3)ह्या लाडू मुळे रक्ताची कमी दूर होते.
4)गव्हामध्ये प्रथिने असतात ज्यामुळे शरीर मजबूत आणि निरोगी राहते.
डिंकाचे लाडू
डिंकाचे लाडू आपण खूप वेळा ऐकली असतील किंवा पहिल्यांदा ऐकत असतील हे ही हिवाळ्यातील पौष्टिक लाडू पैकी एक आहेत. खाण्याचे डिंक आपल्याला माहितीच असेल आणि त्यापासून लाडू तयार केले जातात जे खूप चविष्ट आणि पौष्टिक असतात.
डिंकाचे लाडू तयार करण्यासाठी डिंक, खारीक, खोबरे, बदाम, काजू, तूप, पिठी साखर हे साहित्य लागतात.
फायदे
1)थंडीच्या दिवसांत डिंकाचे लाडू खूप लाभदायक असतात.
2)डिंकाचे लाडू प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदतगार असतात.
3)डिंक हाडे मजबूत कण्यासाठी उपयुक्त आहेत आणि सांधे दुखी बरी करतात.
4)डिंक मुळे पोटाचे विकार दूर होतात आणि पचन क्रिया सुरळीत होते.