Gudi Padwa Wishes in Marathi : नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना द्या अशा शुभेच्छा
गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. पौराणिक कथेनुसार, शालिवाहन नामक एक कुंभाराचा पुत्र होता. शत्रू त्याला खूप त्रास देत असत. मात्र, एकटा असल्यामुळे तो शत्रूशी लढा देण्यास असमर्थ होता. तेव्हा त्याने एक युक्ती केली. शत्रूशी सामना करण्यासाठी त्याने मातीचे सैनिक तयार केले. पाणी शिंपडून त्यांच्यात जीव भरला. शत्रूचे आक्रमण झाले, तेव्हा हेच सैन्य लढले आणि विजयी झाले. तेव्हापासून शालिवाहन शकाचा आरंभ झाला, अशी मान्यता आहे. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. या दिवसाच्या विशेष प्रकारे शुभेच्छा दिल्या जातात. नातेवाईकांची भेट घेऊ शकत नसलो तरी व्हॉटसअप, फेसबुक,शेअर चॅट,ट्विटर, व्हिडीओ कॉल अश्या सोशल साइट्सचा वापर करून शुभेच्छा देणे अधीक शक्य आहे, या माध्यमांद्वारे शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा संदेष……..
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”
“सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”
“उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”
“चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”
“प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा”