खोबऱ्यापासून तयार केलेले लाडू दक्षिण भारतातील अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. कोकणातील काही प्रदेशातही हा लाडू आवडीने खाल्ला जातो. दिवाळी आणि गोड पदार्थांची खमंग मेजवानी हे सुत्र वेगळं आहे. या दिवाळीत काही वेगळे करून पहायचे असल्यास तुम्ही ही लाडूची रेसिपी ट्राय करु शकता. अगदी घरी असलेल्या वस्तूंमधून तुम्ही ही रेसिपी ट्राय करु शकता. ताजे किसलेले खोबरे वापरावे, गुळ असे साहित्या वापरून तुम्ही ही खोबऱ्याचे लाडू बनवू शकता. ते अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी तुम्ही साखरे ऐवजी गूळही वापरू शकता.
साहित्य –
- किसलेले खोबरे – दीड वाटी
- गूळ – 3/4 था कप
- वेलची पावडर – १/४ टी स्पून
- तूप – 1 टीस्पून
- पाणी
कृती –
एका पातेल्यात थोडे पाणी घ्या. त्यात गूळ घालून मंद आचेवर ते शिजवून घ्या. त्या पाण्यात गूळ पूर्णपणे विरघळला की, गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. आता एका हे मिश्रण भांड्यात गाळणीतून गाळून घ्या. दुसर्या बाजूला एक जड तळ असलेले नॉन-स्टिक पॅन घ्या. पॅन मंद आचेवर ठेवून तूप गरम करुन घ्या. नंतर यात किसलेले खोबरे घाला आणि सुमारे 2-3 मिनिटे परतवून घ्या. या किसलेल्या खोबऱ्यात गुळाचे पाणी घाला आणि चांगले एकजीव करा. नंतर वेलची पूड घालून पुन्हा एकदा हे मिश्रण हलवून घ्या. यातील ओलावा निघून जाईपर्यंत शिजवून घ्या आणि तुम्हाला गूळ-नारळाचे मिश्रण सुकताना दिसेल. आता गॅस बंद करा आणि हे मिश्रण थंड होऊ द्या. आपले हाताला तूप लावा आणि लाडू हव्या त्या आकाराचे लाडू वळून घ्या.