बदामाचा शिरा

बदामाचा शिरा – Badam Sheera


साहित्य:
१ १/२ कप बदाम(रात्रभर पाण्यात भिजवलेले)
३ कप गरम दूध
२५० ग्राम तूप
१/२ ते १/३ कप साखर

कृती

  • बदामाची साले काढून त्याची पेस्ट करून घ्या.
  • भांड्यात तूप गरम करा.
  • त्यात बदाम पेस्ट घालून प्रथम मोठ्या आचेवर शिजवून घ्या, मंद आचेवर हलवत रहा.
  • थोड्या वेळाने तांबूस रंगापर्यंत येऊ दया.
  • नंतर त्यात गरम दूध मिसळा आणि हलवत रहा.
  • मिश्रण उकळत असताना लांब पळी वापरावी.
  • मिश्रण थोडं जाडसर झाल्यावर त्यात साखर घालून शिजवा, तूप वेगळे होईपर्यत मिश्रण हलवत रहा.
  • बारीक चिरलेल्या काजू, पिस्ता यांनी सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

Related Stories