Dhulivandanchya Rangmay Shubhechha
होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धूळवड, धूलिवंदन व रंगपंचमी अश्या विविध नावाने संबोधले जाते. तुम्ही जर होळी SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच होळी संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील.
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
धुलिवंदनच्या तुम्हाला
आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा
सुखाच्या रंगांनी
आपले जीवन रंगबिरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नाश होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस
यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंग ज्यामुळे हे आयुष्य सुंदर आहे..
पाणी ज्यामुळे हे आयुष्य आहे..
आयुष्याचा बेरंग होणार नाही असे रंग वापरा..
कमीत कमी पाणी वापरा..
अशी होळी खेळा..
आनंद नक्कीच द्विगुणित होईल..
होळीच्या रंगमय शुभेच्छा !
रंग काय लावायचा,
जो आज आहे तर उद्या निघून जाईल,
लावायचा आहे तर जीव लावा,
जो आयुष्यभर राहील…!
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा !
उत्सव रंगांचा !
पण रंगाचा बेरंग करू नका..
वृक्ष तोडून होळी पेटवू नका..
नैसर्गिक रंगांचाच वापर करा..
मुक्या प्राण्यांना रंगवून त्रास देऊ नका..
फुगे मारून कोणाला इजा करू नका..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू..
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू..
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग..
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो,
गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि,
रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा
जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख,
शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…
शुभ सकाळ !
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !