पोटॅटो क्रिस्पी रिंग
घटक
3 व्यक्तींसाठी
1/2 वाटी बारीक रवा
2 उकडलेले बटाटे
1/2 वाटी पाणी
2 टेबलस्पून बटर
2 टेबलस्पून चिलीफ्लेक्स
चवीनुसार मीठ
2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
4 क्रश लसूण पाकळ्या
1 टेबलस्पून कोथींबीर
पायर्या
1)प्रथम रवा मिक्सर मध्ये बारीक करून घेणे.एका पॅन मध्ये बटर टाकून लसूण पाकळ्या परतून घेणे.नंतर त्यात चीलिफ्लेक्स, मीठ टाकून तीन मिनिटे शिजवून घेणे.
2)मग पाणी टाकून उकळी आणावी आणि रवा टाकून पाच मिनिटे शिजवून घेणे.
3)रवा थोडं थंड होऊ द्यायचा नंतर त्यात उकडलेला बटाटा, कॉर्नफ्लोअर,कोथींबीर एकत्र करून मळून घ्यावे आणि रिंगचा आकार देणे आणि गोल्डन रंग येई पर्यंत तळून घेणे आणि क्रिस्पी बटाटे रिंग तयार आहेत.