जीवनावरील मराठी प्रेरणादायी कविता
1.सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,
सगळेच अश्रू दाखवायचे नसतात,
सगळ्याच नात्यांना नावे द्यायची नसतात,
स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून…
स्वप्न पाहायचीच सोडून द्यायची नसतात,
तर ती मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवायची असतात.
2. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे वाट पाहतात…
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे प्रयत्न करतात…
पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात…
आयुष्य अवघड आहे पण, अशक्य नक्कीच नाही !
3. अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिने
झोका झाडाले टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामध्ये जीव
जीव झाडाले टांगला
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे माणसा
तिची उलीशीच चोच
तेच दात तेच ओठ
तुला देले रे देवान
दोन हात दोन बोट