एकाच दिवसात जीवन जगण्याचे आठ उपाय




Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

केवळ एका दिवसाचे युद्ध ताकदीने लढता येते; परंतु जेव्हा भूतकाळ आणि भविष्यकाळातील समस्या जोडल्या
जातात तेव्हा मोठी अडचण होते. त्यासाठी एका वेळेस एकाच दिवसाचे म्हणजे फक्त आजचेच जीवन जगायला हवे.

1 भीतीला सामोरे जा : प्रत्येक दिवशी मनासारखे होणार नाही. त्या दिवशी येणा-या समस्यांना सामोरे कसे जावे, हे समजायला हवे. त्यामुळे वाईट काळाचे दु:ख कमी होईल व पराभवाची भीती राहणार नाही. जेव्हा असे होईल तेव्हा पुढे जाण्याच्या संधी चालून येतील.
2 कठीण काळ जाऊ द्या : जेव्हा एखादा दिवस, महिना किंवा वर्ष वाईट जाते तेव्हा तो काळ जाऊ द्या. भूतकाळातील चुकांपासून काही शिकल्यास भविष्यात चुका होणार नाहीत.
3 जोखीम घेण्याचे आव्हान : जीवनात तुम्ही कोणतीही जोखीम घेतली नसल्यास त्याचा अर्थ, तुम्ही प्रत्येक गोष्टीची जोखीम घेत आहात. तुम्ही एका योग्य वेळेची वाट पाहू शकत नाही. 20 सेकंद असे केल्याने तुम्ही बेचैन व्हाल व त्यातून काही चांगले निघेल.
4 स्वत:ला प्रश्न विचारत राहा : तुम्ही स्वत:ला मी कोण आहे? मला काय करायचे आहे? मी आपले काम सर्वात चांगले कसे करू शकतो आणि पुढचे असे कोणते पाऊल आहे जे उचलणे योग्य ठरेल? असे प्रश्न विचारा.
5 कठोर मेहनत करत राहा : शंका-कुशंकांच्या जगात स्वप्न पाहण्याचे व रागाच्या जगात माफ करण्याचे साहस करा. त्यामुळे तुमच्यात अशी शक्ती येईल जी तुमच्याजवळ नसेल. नकारात्मकतेतून सकारात्मक व्हाल. हीच लीडरशिप आहे. मूकपणे आपले काम करत राहा.
6 समस्यांवर उपाय शोधा : समस्या सोडवण्याचा असा उपाय काय कामाचा ज्यामुळे समस्या अधिकच जटिल होईल. जो उपाय फक्त समस्या टाळेल, त्याचाही काही उपयोग नाही. कायमस्वरूपी प्रश्न सुटेल असाच उपाय शोधायला हवा. तसेच आव्हाने स्वीकारा व संकटांशी लढण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल.
7 खरे बोलण्यापासून स्वत:ला थांबवू नका : आपले विचार आणि भावना लपवू नका. साहसी व्हा व खरे बोला. खरे बोलू शकत नसाल, तर त्यापेक्षा मोठे दु:ख काहीही नाही. तुम्हाला वास्तवाची जाणीव झाली नाही, तर तुम्ही आनंदी राहू शकणार नाही. तसेच अशा परिस्थितीत आनंदी राहण्याचा देखावा केल्यास तो सर्वात मोठा खोटेपणा ठरेल.
8 मित्र एकच; पण खरा हवा : आता किंवा काही कालावधीनंतर तुम्हाला अशी माणसे हवी असतील, जी जवळपास असल्याने तुम्हाला बरे वाटेल. त्यामुळे त्यांच्याबरोबर अधिक वेळ घालवा. कारण एकच खरा
मित्र तुमचे दु:ख व अडचणी कमी करू शकेल. 100 मित्रांपेक्षा असा एकच मित्र तुमच्यासाठी चांगला असेल. त्यामुळे तुमच्या जीवनात सुख आणि आनंद येईल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu