कैरीची चटणी
सााहित्य- एक कैरी, एक कांदा, दीड ते दोन चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ, अर्धा पळी तेल फोडणीसाठी, एक चमचा बारीक मोहरी आणि अर्धा चमचा हिंग
कृती– सर्वप्रथम कैरी आणि कांदा एकत्र किसून घ्या. नंतर तो कीस दाबून त्यातील पाणी काढून टाका. आता एका भांड्यात किसलेले कैरी आणि कांदा, लाल तिखट, हळद, साखर आणि मीठ घेऊन एकजीव करा. सर्वात शेवटी मोहरी आणि हिंगाची फोडणी तयार करून चटणीसोबत एकजीव करा. आंबट-गोड-तिखट अशी ही चटपटीत कैरीची चटणी तयार! वरण-भातासोबत तोंडी लावायला म्हणून हा पदार्थ होऊ शकतो.