ताडगोळे आणि सफरचंद खीर – Marathi Recipe

Like
Like Love Haha Wow Sad Angry

ताडगोळे आणि सफरचंद खीर
घटक
1) ४-५ ताडगोळे
2) 1 सफरचंद किसुन
3) 1 लीटर दुध
4) 1 चमचा खीर मसाला
5) 1 चमचा चारोळी
6) 1/2 वाटी साखर
7) 8-10 काजुचे तुकडे
8) 8-10 बदामाचे तुकडे
9) 2 थेंब रोज ईसेन्स

 

कृती
1) प्रथम ताडगोळे स्वच्छ धुवुन त्याची साले काढुन गर घ्या.
2) आता दुध आटवायला ठेवा.दुध आटवून एक लीटरचे अर्धा लीटर पर्यंत आटवा.आटवताना त्यात साखर घालुन घ्या.
3) आता सफरचंद किसुन घ्या. मग ताडगोळ्याचे चौरस आकार छोटे तुकडे करून घ्या.
4) आता या आटवलेल्या दुधात सफरचंद कीस आणी ताडगोळ्याचे तुकडे घाला.काजु,बदाम,चारोळी,खीर मसाला घाला.
5) दोन थेंब रोज ईसेन्स घाला.याने एक वेगळाच फ्लेवर येतो.
6) आता दोन मिनीटानी गॅस बंद करा.आपली ताडगोळे आणि सफरचंदची खीर तयार आहे.मस्त ड्राय फ्रूट्स ने डेकोरेट करून सर्व्ह करावे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories