वर्धामधील प्रसिद्ध स्थान
लक्ष्मीनारायण मंदीर
भगवान विष्णू. आणि महालक्ष्मी चे हे मंदिर आतील बाजूने पूर्ण संगमरवरी असे आहे. हरिजनांसाठी स्वकर्गीय जमनालाल बजाज यांनी मंदिर खुले केले. 19 जुलै 1928 साली या खुल्या् केलेल्याल मंदिराच्याि शेजारीच गोरगरीबांसाठी औषधीचे दुकानही त्यांनी उघडले. या मंदिराची बांधणी 1905 मध्ये करण्यात आली होती.
परमधाम आश्रम पवनार
पवनार एक ऐतिहासिक गांव है जो महाराष्ट्र के वर्धा जिले में धाम नदी के तट पर बसा है. यह गांव जिले की सबसे प्राचीन बस्तियों में एक है.राजपूत राजा पवन के नाम पर इसका नाम पवनार पड़ा. गांव में गांधी कुटी और आचार्य विनोबा भावे का परमधाम आश्रम देखा जा सकता है.
गिरड दर्गा
वर्ध्या पासून 59 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तहसीलमध्ये गिरड हे गाव आहे. याठिकाणी शेख फरीद बाबाचा दर्गा आहे. दर्ग्याजवळ तलाव आहे. गावात भोसलेकालीन राम मंदिरही आहे. रामनवमीला याठिकाणी यात्रा भरते. तसेच दहा दिवसीय मोहरम उत्संवही येथे भरतो. सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हयणून या गावाकडे पाहिले जाते.
सेवाग्राम आश्रम
सन 1940 साली गांधीजींनी सेगाव या गावाचे नामकरण सेवाग्राम केले. महात्मास गांधीच्या पदस्पर्श आणि वास्तव्याने पुनीत झालेले क्षेत्र म्हणजे सेवाग्राम. वयाच्या 67 व्या वर्षी म्ह्णजेच 30 एप्रिल 1936 च्या पहाटे महात्मा गांधी वर्ध्या पासून आठ किलोमीटर अंतरावरील सध्याच्या सेवाग्राम या ठिकाणी पोचले. पाच ते सहा दिवस ते याठिकाणी राहिले. येथील ग्रामस्थांना त्यांनी त्यांच्या येण्यामागील उद्देश सांगितला. तसेच भूमिका विषद केली. त्या्नंतर हळूहळू सेवाग्राम आश्रम भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचे केंद्र बनले. सेवाग्रामचे पूर्वीचे नाव सेगाव होते. हे गाव पूर्ण जंगलाने वेढलेले होते. ना पोस्ट ऑफिस ना टेलिग्राफ ऑफिस. केवळ सेवाग्राम गावाकडे येण्यासाठी एक पादचारी आणि बैलगाडीचा रस्ता होता.सेवाग्राम येथे गांधीजी येण्यापूर्वीच मीरा बेन येथे वास्तंव्यास होत्याह. सेवाग्रामकडे येण्यासाठी त्याकाळात पक्का रस्ताही नव्हाता. परंतु जेव्हा गांधीजी सेवाग्राम येथे आले तेव्हा तत्काळ येथे एक बगल रस्ता तयार करण्यावत आला. गांधीजींनी त्यांच्या वास्तयव्यासाठी उभारण्यातत येणा-या कुटीकरीता 500 रुपयांहून अधिक खर्च लागणार नाही ही अट घालून कुटी उभारण्याएसाठी परवानगी दिली. या कुटीलाच आदि निवास म्हणून ओळखले जाते. या कुटीमध्ये महात्मा गांधीजी, कस्तुरबा गांधी, सरहद्द गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राहायचे. याच कुटीतून पुढे महात्मा गांधी बापू कुटीत राहायला गेले.
बोर व्याघ्र प्रकल्प
बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्हा मुख्यालयापासून 40 किमी आणि नागपूरपासून 65 किमी अंतरावर आहे. जंगली प्राणी जसे वाघ, कोल्हे, कुत्रे, अस्वल दिसतात. मोर मुबलक प्रमाणात आहेत. हे ठिकाण पाहण्यायोग्य आहे.