अमरावती प्रसिद्ध बाग आणि मंदिर
1) श्री अंबादेवी मंदिर
अमरावती शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी चौकात असलेल्या अंबादेवीचे मंदिर अंबादेवीला समर्पित असून, या प्राचीन, अध्यात्मिक मंदिराचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो आणि राजा भीष्मकाची कन्या रुक्मिणी हिने शिशुपालाशी लग्न केल्याचे मानले जाते. भगवान श्रीकृष्णाने तिचं येथून अपहरण करून नंतर तिच्याशी विवाह केल्याचे सांगितले जाते.अंबा देवीचे मंदिर राज्यभरातून असंख्य भाविकांना आकर्षित करते जे नवरात्री आणि दसऱ्याच्या उत्सवात मंदिराला मोठ्या संख्येने भेट देतात. उत्सव साजरे असलेले मंदिर आहे.
2)श्री भक्ती धाम मंदिर
श्री भक्ती धाम मंदिर हे अमरावती येथे स्थित एक भव्य मंदिर आहे. अमरावतीच्या बडनेरा रोडवर असलेल्या श्री भक्ती धाम मंदिरात भगवान कृष्ण आणि त्यांची प्रिय राधा यांच्या अनेक सुंदर मूर्ती आहेत. येथे श्रीसंत जलाराम बाप्पाची मूर्तीही पवित्र गाभार्यात विराजमान आहे. मंदिरामागील एक छोटेसे बाग मुलांमध्ये लोकप्रिय आहे. मंदिरात टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि टांगा याद्वारे सहज जाता येते.
3)मेळघाट वाघ
या मेळघाट अभयारण्यातील विविध जातीच्या पक्ष्यांनी आणि प्राण्यांनी या ठिकाणाचा परिसर जिवंत ठेवला आहे. त्यामुळे अनेक पक्षी प्रेमी आणि निसर्गप्रेमी या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांन दरम्यानचा काळ हा येथील निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी उत्तम आहे. आणि मेळघाट अभयारण्यातील प्राणी पाहायचे असेल तर मार्च ते जून या महिन्यांन दरम्यान चा कालावधी उत्तम आहे.हिरवाईची चादर पांघरलेला इथला प्रदेश दूरवर पसरलेल्या उंच उंच पर्वत रांगा आणि खोल दऱ्या यामुळे मेळघाट अभयारण्य पर्यटनाचे उत्तम ठिकाण आणि आकर्षित ठिकाण बनले आहे.
4)बांबू बाग
अमरावतीच्या वडाळी येथील वन उद्यानात २३ वर्षापूर्वी लावलेलं बांबूचं रोपटं आज जवळपास १८ हेक्टर परिसरात बांबू उद्यान म्हणून विस्तीर्णपणे पसरलं आहे. भारतातील सर्वात मोठं आणि पहिल बांबू उद्यान म्हणून नावारुपास येण ही बाब महाराष्ट्राकरिता अत्यंत अभिमानास्पद आहे. या बांबू उद्यानात एक फुटापासुन ते शंभर फुटापर्यंत वाढलेल्या बांबूच्या रांजी पसरलेल्या दिसतात. देशविदेशातील ६३ प्रकारच्या विविध बांबू प्रजातीतून हे उद्यान साकारलं असून बासरीसाठी लागणारा ‘मेलीकाना बासिफेरा’ बांबू, जगातील सर्वात मोठा जाडी असलेला महाबांबू, सर्वात्ा ऊंच वाढणारा ड्रायड्रोक्लेनेस ब्रँडेसी, अंदमानचा वेली बांबू, आसामचा सरळ वाढणारा बिन फांद्यांचा बांबू येथे आहे. आता तर बांबूवर आधारित विविध उपयोगी आकर्षक वस्तुचे उत्पादन आणि विक्रीही सुरु झाली आहे. वडाळीच्या या बांबू उद्यान परिसरात सोबतीला कमळ उद्यान, कॅक्टस उद्यानसुध्दा आहेत. ते पाहण्याकरिता दिवसेंदिवस वाढणारी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी ही सरकारच्या वन विभागास मिळणारी यशाची पावती आहे.
5)गाविलगड किल्ला
किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ मोठे तर ३ लहान तलाव आहेत. साधारणत: ६ ते ७ तोफा असून नाजूक स्थितीमध्ये आहेत, पण त्यातील फक्त ३ तोफा अजूनही शाबूत आहेत. त्यामध्ये बिजली तोफ ही लांबीला कमी तर व्यासाला मोठी आहे, तर कालभैरव तोफ ही २० फुट लांब तर व्यासाला कमी आहे. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो. मात्र, किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. या किल्ल्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; पण तोही दुर्लक्षित आहे.