टोमॅटो सूप – Marathi Recipe

Like
Like Love Haha Wow Sad Angry

आपण नेहमीच जेवणाआधी टोमॅटो सूप घेणं पसंत करतो. थंडीत तर हे सूप जास्तच चवदार लागतं. या सूपमध्ये कॅलरीची मात्रा खूपच कमी असते. यामध्ये व्हिटॅमीन ए, ई, सी, के आणि अँटी ऑक्सीडंट्ससारखी पोषक तत्त्व असतात. जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. टोमॅटो सूप पिणाऱ्यांच्या शरीरात कधीच रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. याशिवाय हे डायबेटीजवरही लाभदायक आहे.

टोमॅटो सूप (Recipe Of Tomato Soup)
आवश्यक साहित्य (Necessary Ingredients)
टोमॅटो- 3 से 4 मध्यम आकाराचे
लसूण- 2 ते 3 कळ्या
कांदा- 1 छोटा
तमालपत्र – 1 पान
काॅर्नफ्लोवर- 1 छोटा चमचा
बटर- 1 ते दीड छोटा चमचा
पाणी- 1 कप
क्रीम- 1 ते 2 चमचे
साखर- अर्धा चमचा किंवा आवश्यकतेनुसार
ब्राउन किंवा व्हाईट ब्रेड- 1 ते 2 स्लाईस
काळी मिरी – चवीनुसार
मीठ- चवीनुसार

टोमॅटो सूप बनवण्याची कृती (Method To Make)
1- सर्वात ताजे आणि लाल टोमॅटो धूवून घ्या.
2- आता एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात एक छोटा चमचा मीठ घालून उकळून घ्या.
3- आता उकळत्या पाण्यात टोमॅटो घाला आणि गॅस बंद करा.
4- आता हे उकळतं पाणी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं छाकून ठेवा.
5- या दरम्यान लसूण आणि कांद्याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवा.
6- आता एक तवा घेऊन गॅसवर ठेवा. त्यावर दोन्ही बाजूने ब्रेड ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या.
7- नंतर भाजलेल्या ब्रेडचे चौकोनी तुकडे करून घ्या.
8- आता कोर्नफ्लोवर पाण्यात मिसळून पेस्ट बनवून घ्या.
9- वेळ पूर्ण झाल्यावर पाण्यातून टोमॅटो काढून घ्या आणि त्याची सालं काढा.
10- आता टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून त्याची प्युरी करून घ्या.
11- यानंतर एक पॅन गॅसवर ठेवून त्यात बटर घाला. बटर वितळल्यावर त्यात तमालपत्र घाला आणि 5 ते 6 सेकंदापर्यंत तळून घ्या. नंतर त्यात लसूण करून सोनेरी होऊ द्या.
12- अशाच प्रकारे त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत तळा.
13- आता या मिक्श्चरमध्ये टोमॅटो प्युरी, मीठ आणि काळी मिरी मिक्स करा. मंद आचेवर सूप शिजू द्या, जोपर्यंत त्याला उकळी येत नाही.
14- उकळी आल्यावर त्यात काॅर्नफ्लोवरची पेस्ट घाला आणि 3 ते 4 मिनिटांपर्यंत मंद आचेवर शिजू द्या.
15- आता यात थोडी साखर घाला आणि क्रीम करून गॅस बंद करा.
16- तुमचं सूप तयार आहे. आता हे सूप बाऊलमध्ये घेऊन ब्रेडचे तुकडे त्यात घाला आणि कोथिंबीरीने सजवा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories