Kelyache Cutlet – Marathi Recipe
साहित्य:
४ मध्यम कच्ची केळी , १ इंच आलं किसून , १/२ चमचा वाटलेली हिरवी मिरची
पाव वाटी चिरलेली कोथिंबीर , १ चमचा धनेजीरे पूड , १/४ चमचा चाट मसाला
१/४ चमचा गरम मसाला , १५-२० बेदाणे , १/२ वाटी ब्रेड क्रम्ब्ज , चवीपुरते मीठ
ब्रेडक्रम्ब्ज बाहेरून कोट करायला
कृती:
१) प्रत्येक केळ्याचे २ तुकडे करावेत. सालासकट कुकरमध्ये ३ शिट्ट्या करून शिजवून घ्यावेत. केळी शिजली की साल काढून आतला गर किसून घ्यावा. २) किसलेल्या केळ्यात आलं, मिरची, कोथिंबीर, धनेजीरेपूड, चाट मसाला, गरम मसाला, १/२ वाटी ब्रेड क्रम्ब्ज आणि मीठ घालून मळून घ्यावे. 3) छोट्या लिंबाएवढे गोळे करावेत. आतमध्ये १-२ बेदाणे घालून कटलेट तयार करावेत. कटलेटना थोडासा पाण्याचा हात लावून ब्रेड क्रम्ब्जमध्ये घोळवावेत. गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावेत. हिरवी चटणी किंवा टॉमेटो केचपबरोबर सर्व्ह करावेत.