रामगड (Ramgad)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

रामगड

सांगली जिल्ह्यामध्ये रामगड (रामदुर्ग) नावाचा एक अतिशय छोटा किल्ला आहे. किल्ल्याची उंची जेमेतेम १५० फूट आहे. जत हा सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुका. याच तालुक्यात जत-कवठे महांकाळ रस्त्यावर जतपासून अवघ्या ५ किमी अंतरावर रामपूर नावाचे गाव आहे. या गावात एक छोटा, देखणा व अप्रसिद्ध किल्ला लपला आहे त्याचे नाव रामगड. रामपूर गावाच्या मागच्याच टेकडीवर हा छोटेखानी किल्ला आहे. ही टेकडी इतकी छोटी आहेत की टेकडी चढायला सुरुवात करेपर्यंत माणूस किल्ल्याच्या महादरवाज्यात येऊन पोहोचतो. रामपूर गावाच्या मागे एक पाण्याची टाकी आहे तेथून अगदी पाचच मिनिटात रामगडाच्या ढासळलेल्या तटबंदीवरून किंवा प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करता येतो. इथल्या स्थानिकांना या किल्ल्याबद्दल कोणतीही आस्था दिसत नाही हे किल्याच्या दुरवस्थेवरूनच लक्षात येते. किल्ल्यामध्ये बाभळीचे भयंकर रान माजले आहे त्यामुळे येथे चालताना खूप काळजी घ्यावी लागते.रामगड किल्ल्याचे प्रवेशद्वार सुस्थितीत असून तटबंदी मात्र बरीचशी ढासळली आहे. तटबंदीमधेच एक दरवाजा अगदी साधेपणाने बांधलेला आहे ज्याची कमान अजून तरी टिकून आहे. दरवाज्याच्या आतील पहारेकर्‍यांच्या देवड्या व पायर्‍या पूर्णपणे उद्‌धस्त झाल्या आहेत. गडाच्या डाव्या बाजूला तटबंदी मधून वेगळा असलेला एक उंच टेहळणी बुरूज आहे; त्यावर भगवे निशाण लावलेले आहे. या टेहाळणी बुरुजाव्यतिरिक्त या रामगड किल्ल्या ला दुसरा कोणताही बुरूज नाही.रामगडाच्या मागच्या बाजूस एक तलाव आहे. गडाची तटबंदी अगदी त्या तलावापर्यंत खाली बांधत नेलेली आढळते. याच ठिकाणी एक चोर दरवाजा व तलावापर्यंत जाण्यासाठी काही पायर्‍या दिसतात. मात्र बाभळीच्या प्रचंड झाडीमुळे खाली उतरता येत नाही.रामगड किल्ल्या मध्ये वाड्याचे अथवा सदरेचे वाटावे असे काही अवशेष दिसतात.किल्ल्याच्या मध्यभागी एक सुंदर हेमाडपंती शिवमंदिर आहे. मंदिराला अर्धमंडप व गाभारा असून मंडपातील खांब घडीव दगडाचे आणि गोलाकार आहेत. मंदिराशेजारच्या बाभळीच्या झुडपात एक उखळ दडलेला आहे. गडाची तटबंदी ठिकठिकाणी ढासळली असली तरी या गडाचे अवशेष अजूनही पाहण्यासाखे आहेत.गडाचा इतिहास फारसा ज्ञात नाही पण शिवाजी महाराज इथे येऊन गेल्याचे स्थानिक आवर्जून सांगतात. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी आदिलशाहीवर केलेल्या अनेक बेधडक आणि धाडसी मोहिमांचा इतिहास पाहता या गडाला त्यांचेही वास्तव्य लाभले असण्याची शक्यता आहे. किल्ल्यावरील हेमाडपंती शिवमंदिर मात्र या टेकडीच्या किंवा या किल्ल्याच्या प्राचीनतेची साक्ष देते.
पहाण्याची ठिकाणे
गडाच्या पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. गडाचे प्रवेशद्वार ८ फुट उंच आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला १८ फूट उंच बुरुज आहेत. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्यांची योजना केलेली आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस थोड्या अंतरावर अजून एक (चोर) दरवाजा आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला तटबंदी ठेऊन सरळ चालत गेल्यावर आपल्या होळींच्या माळावर पोहोचतो. तेथे ७ तोफा रांगेत उलट्या पुरुन ठेवलेल्या दिसतात. त्यातील सर्वात मोठी तोफ ७ फूट लांबीची आहे. या तोफां समोरच किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे. हे उत्तराभिमुख प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे आहे. प्रवेशद्वाराच्या आत देवड्या आहेत. परंतू प्रवेशद्वारा बाजूच्या बुरुजांचे चिरे ढासळल्यामुळे प्रवेशद्वारातून रामगड गावातील होळीवाडीत जाणारा मार्ग बंद झाला आहे. या प्रवेश द्वाराच्या डाव्या हाताच्या तटबंदीवरुन गड नदीचा प्रवाह दिसतो. गडाच्या मधोमध बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेले आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या तटावर काळ्या पाषाणातील गणपतीची अत्यंत सुबक मुर्ती आहे. बाजूलाच काही शाळूंका आहेत. या तटावरुन दुसर्‍या बाजूला पायर्‍यांनी उतरल्यावर आपण किल्ल्याच्या सध्याच्या प्रवेशरापाशी येतो व आपली गडफेरी पूर्ण होते. गडाला १८ फूट उंचीचे १५ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजाला ३ दिशांना खिडक्या आहेत. बुरुजांच्यामध्ये १८ फूटी तटबंदी असून तीने पूर्ण किल्ल्याला वेढलेले आहे. तटबंदीची लांबी अंदाजे ६४० मीटर आहे. गडावर किल्लेदाराच्या वाड्याचा चौथरा आहे, पण पाण्याची विहीर अथवा तलाव आढळत नाही.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu