पेब किल्ला (Peb Fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

पेब किल्ला

पेब विकटगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पनवेलच्या ईशान्येला मुंबई-पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे.पनवेलच्या ईशान्येला, मुंबई पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन चार किलोमीटर अंतरावर पेबचा किल्ला विकटगड आहे. गडाखालच्या पेबी देवी वरून या किल्ल्याचे नाव पेब ठेवण्यात आलेले असावे. माथेरान सारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणा जवळ, पण माणसांच्या गर्दीपासून दूर असलेला पेबचा किल्ला एका दिवसाच्या ट्रेकसाठी आदर्श जागा आहे. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ चढची वाट, वरील गुहेची रचना, गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड अजोड आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी नेरळ, माथेरान, पनवेल या तिनही ठिकाणांहून वाटा आहेत.या किल्ल्याचे मूळ नाव “पेब” हे नाव पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.

पाहण्यासाठी ठिकाणे
पेबचा किल्ला नेरळ किंवा पनवेल मार्गे चढून आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक प्रचंड गुहा दिसते. या गुहेत साधारणत: १०० जण राहु शकतात. या गुहेच्या बाजूला चौकोनी तोंड असलेल्या गुहा आहेत. या गुहांमध्ये रांगत जाता येते. यातील एका गुहेत खालच्या बाजूला एक माणूस बसू शकेल इतकी छोटी खोली आहे. मोठ्या गुहेच्या वरच्या बाजूस सुध्दा अशाच प्रकारच्या गुहा आहेत. त्यापैकी शेवटच्या गुहेच्या आत टोकाला पाण्याच टाक आहे. ( मोती गुहा सोडून इतर सर्व गुहांमध्ये जाण्यासाठी विजेरी आवश्यकता आहे.) या गुहा पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या भिंतीचे अवशेष दिसतात. त्यावर चढून जाण्यासाठी एक शिडी आहे. या शिडीवर न चढता खालच्या बाजूस गेल्यावर कातळात खोदलेली २ पाण्याची टाक पाहायला मिळतात.पुन्हा शिडीजवळ येऊन शिडी चढून गेल्यावर उजव्या हाताला पाण्याचे कातळात खोदलेले टाक आहे. त्याच्या बाजूलाच हनुमानाची मुर्ती आहे. येथून वर चढून उजव्या हाताला वळल्यावर वास्तुंचे अवशेष आहेत. तिथून पुढे गेल्यावर आपण दत्तमंदिरा/ आश्रमा जवळ पोहोचतो. या मंदिराच्या बाजूने किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाण्याची वाट आहे. या वाटेवर एक शिडी आहे. ही शिडी चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो. येथे दत्ताच्या पादुका आहेत. येथून पूर्वेकडे नेरळ व उल्हास नदी , पश्चिमेकडे गाडेश्वर तलाव, पनवेल, उरण, उत्तरेकडे म्हैसमाळ ,चंदेरी, ताहूली ही डोंगररांग व दूरवर मलंगगडाचे सुळके दिसतात. दक्षिणेकडे माथेरनचा डोंगर व प्रबळगड दिसतो. पादुकांचे दर्शन घेऊन परत दत्तमंदिरा जवळ येऊन गडाच्या दक्षिण टोकाकडे जावे. येथे गडावरील एकमेव बुरुज आहे. माथेरान मार्गे गडावर येतांना आपण या बुरुजा खालून येते. बुरुज पाहून परत दत्तमंदिरा जवळ येउन खालच्या बाजूला गेल्यावर कड्याजवळ २ पाण्याच्या कोरडी टाकं आहेत. या टाक्र्‍यांच्या पुढे महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवर पेबी देवीची मुर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या बाजूला थंडगार पाण्याचे टाक आहे. या टाक्याच्या भिंतीवर यक्ष प्रतिमा कोरलेली आहे. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. येथून आल्या मार्गाने किल्ला उतरुन नेरळ किंवा पनवेलला जाता येते किंवा बुरुजा खालच्या वाटेने माथेरान – नेरळ रस्त्यावर पोहोचून नेरळला जाता येते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा