पट्टागड
या किल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतच्या काळात (इ.स. १३४७]]-इ.स. १४९०) झाले. त्यानंतर याचा ताबा येथील स्थानिक रहिवासी आदिवासी कोळी महादेव जमातीकडे गेला त्यानंतर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला. इ.स. १६२७ मध्ये मुगलांनी हा किल्ला जिंकला. समुद्र सपाटीपासून ८८२ मीटर उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी कुर्डाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारात शिरण्याअगोदर डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर अवशेषरूपी प्रवेशद्वारातून किल्ल्यात जाता येते. किल्ल्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळकाच आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर शिरल्यावर एक उद्ध्वस्त वास्तूचा चौथरा दिसतो. त्याच्या समोर एक मीटर उंचीची हनुमान मूर्ती आहे. या मूर्तीच्या पुढे एक निसर्गनिर्मित, १०० ते १५० माणसे सहज बसू शकतील एवढी घळ आहे.
किल्ल्यातच दोन भलेमोठे सुळके आहेत आणि हा भलामोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय. सुळक्याला वळसा घालून पुढे गेल्यावर दोन सुळक्यांच्या मधला भाग तटबंदी करून बंद केला आहे. तटबंदी चांगल्या स्थितीत आहे.तटबंदीच्या पुढे गेल्यावर एक महाकाय दरड कोसळलेली दिसते. येथून पुढे जाता येत नाही. येथून पुढे जाणे धोकादायक आहे. दरड व मुख्य सुळका यांच्यामध्ये असलेल्या छोट्या जागेतून सरपटत जावे लागते. एका बाजूला दरी असल्याने पाय घसरण्याची भीती असते. गड फिरण्यास फारसा वेळ लागत नाही. हा गड ताम्हिणी घाटावरील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. कोकणाचे विहंगम दृश्य येथून दिसते. माणगावकडून गाडीमार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव लागते. तिथूनच याची चढण सुरू होते. फारसा प्रसिद्ध नसलेला कुर्डुगड पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे छत्रपती शिवाजीराजांचे सरदार होते. बाजी पासलकर कुर्डुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत. म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात.
पट्टागड पाहण्यासारखे
काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात.या गडावर दोन गुहा आहेत. गुहांच्या पुढे त्रिंबक प्रवेशव्दार आहे. एक सातवाहन कालीन पाण्याचे टाके आहे.टाक्यापासून पुढे गेल्यावर अष्टभुजा पट्टा देवीचे मंदिर लागते.किल्ल्यावर एक अंबारखाना आहे.अंबरखान्याचा आत शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे.गडावर औंढा किल्ल्याच्या दिशेला गेल्यावर पाण्याची दोन मोठी टाकी लागतात.पुढे एक गुहा आहे. गुहेचे ओसरी आणि दालन असे दोन भाग आहेत. ओसरी दोन खांबांवर तोललेली असुन दालन चार खांबांवर तोललेल आहे.गुहांच्या पुढे गेल्यावर ओळीत खोदलेली पाण्याची ७ टाकी दिसतात पुढे गेल्यावर अजुन एक गुहा पाहायला मिळते.पुढे पाण्याची १२ टाकी पाहायला मिळतात. त्यांना “बारा टाकी” म्हणून ओळखतात.पुढे गेल्यावर दिल्ली दरवाजा लागतो.