पालगड किल्ला (Palgad fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

पालगड किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. इतिहासात फारस काही न घडलेला हा किल्ला पालगड गावाच्या मागे दाट झाडीत उभा आहे. खेड – दापोली रस्त्यावर असलेले हे गाव साने गुरुजींच जन्मस्थान आहे. या किल्ल्याचे स्थान पाहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा.पालगड हे दापोली तालुक्यातील (रत्नागिरी जिल्हा) एक छोटेसे टुमदार गाव आहे. गावाजवळ पालगड किल्ला आहे.साने गुरुजी ह्यांचा जन्म पालगड येथे झाला. त्यांच्या श्यामची आई ह्या पुस्तकात पालगडचा उल्लेख सतत आढळ्तो. आज गावात साने गुरुजींच्या नावाची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. लवकरच गावात साने गुरुजी स्मारक बांधण्यात येईल.पालगड गावातील गणपती मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. इ.स. १९९६ साली गणपती मंदिराचा शतसांवत्सरिक महोत्सव साजरा करण्यात आला. पालगड महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने दापोली, खेड, मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि इतर महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे.

पहाण्याची ठिकाणे
१५ एकर क्षेत्रफळाच्या पसरलेल्या या किल्ल्याचे पूर्वाभिमूख प्रवेशद्वार उध्वस्त झालेले आहे, परंतू बुरुज अजून शाबुत आहेत. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक तोफ आकाशाकडे तोंड करुन पूरलेली आहे. अशीच दूसरी तोफ होळीच्या माळावर व तिसरी तोफ गावात विहिरीजवळ शेतात पूरलेली आहे. प्रवेश द्वारातून आत शिरल्यावर वाड्र्‍यांचे काही जोते आहेत. तेथून पूढे गेल्यावर एक सुकलेल टाक आहे. गडाच्या निमूळत्या होत गेलेल्या सोंडेच्या टोकाला बुरुज आहेत. गडाची तटबंदी थोड्याफार प्रमाणात शाबूत आहे. गडाच्या माचीवर वस्ती आहे.उत्तरेकडील धारेवर पोहोचल्यावर गडाची तटबंदी व गडावर जाणाऱ्या बांधीव पायऱ्या दिसून येतात. अंदाजे ८० ते १०० जुन्या बांधणीतील पायऱ्या चढून गडाच्या दोन बुरुजांमधील दरवाजाजवळ जाता येते. दरवाजाची कमान सध्या अस्तित्वात नसली तरीही दोन बुरूज व कमान पेलणारे खांब दिसतात. बुरुजांमधून प्रवेश केल्यावर समोर एका मोठ्या वास्तूचे जोते आहे. या जोत्यावर दीड मीटर लांबीची एक तोफ आहे. दरवाजातून आत आल्यावर पायवाट उजवीकडे म्हणजेच पश्चिमेकडे जाते. गडावर बांधकामाची तीन जोती आहेत. गडाच्या मधोमध खडकात खोदलेली एक छोटी विहीर आहे. इतर गिरिदुर्गांप्रमाणे या किल्ल्यावर खडकात खोदलेली पाण्याची टाकी नाहीत. उत्तर-पश्चिमेकडील तटबंदीवर एक तोफ उभी जमिनीत रोवून ठेवलेली आहे. गडावर एकूण दोन तोफा आहेत. गडाची तटबंदी व बुरूज दुरवस्थेत आहेत.काही भागांत साधारणतः पाच फुटापर्यंत तटबंदी दिसून येते. शिवकालीन बांधकामातील किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही किल्ल्याला एका पेक्षा जास्त दरवाजे असतात. पण पालगड किल्ल्याला एकच दरवाजा आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची बांधणी मात्र शिवकालीन वाटते. गडावर दुसरा दरवाजा असल्याचे अवशेष अद्यापि दिसून आलेले नाहीत.या किल्ल्याचे बांधकाम छ. शिवाजी महाराजांच्या काळात झाल्याचे पुरावे मिळत नाहीत. सभासद बखरीमध्ये महाराजांकडे असलेल्या किल्ल्यांची यादी असून त्यामध्ये पालगडचे नाव नाही. इ. स. १७२६ मध्ये कान्होजी आंग्रे यांचे जंजिरेकर सिद्दीबरोबर पालगड जिंकून घेण्यासाठी युद्ध झाले. या प्रसंगी कान्होजींना पालगड घेण्यात यश आलेले दिसत नाही. कारण इ. स. १७२९ मध्ये कान्होजी आंग्रे यांनी पालगड जंजिरेकर सिद्दीकडून घेतला, अशी माहिती मिळते. यावरून हा किल्ला छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत बांधला गेला असण्याची शक्यता आहे. रामाजी महादेव यांनी १६ मे १७६५ रोजी जे सात किल्ले घेतले त्यात पालगड होता. किल्ल्याच्या पायथ्याच्या गावामध्ये साने गुरुजी यांचे स्मारक आहे. पालगड हे साने गुरुजींचे जन्म गाव असून त्यांच्या जुन्या घराचे नुतनीकरण करून स्मारक करण्यात आले आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा