लिंगाणा किल्ला (Lingana fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

लिंगाणा किल्ला

लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे कातळ २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे.रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह होते. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी यासाठी अतिशय अनुकूल आहेत. जर कोणी पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमावणे हाच एक उपाय होता. गडावरचे दोर आणि शिड्या काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद होत असत.लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे.माणगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचे घोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे.लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत.रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत.या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत. वर अतिअवघड असा वाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा, त्यामुळे येथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होऊन कैदी अगदी खचून जात असत. पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे.

जर कोणी कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमवावाच लागे. गडावरचे दोर आणि शिडा काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद.मोऱ्यांचा पराभव केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाजवळ हा किल्ला बांधला. इथल्या गुहेत, जे जुने कारागृह होते, त्यात एका वेळेस ५० कैदी ठेवत.१६६५ सालच्या पुरंदर तहामध्ये रायगड आणि त्या परिसरातले किल्ले लिंगाणा व बाणकोट महाराजांकडेच राहिले. लिंगाण्याच्या गिर्दनवाहीचे जननी व सोमजाई हे देव होते. त्यांच्या नवरात्राच्या उत्सवाची रायगडाच्या जमाखर्चातून तरतूद होत असे. या देवतांना बकरे बळी देण्याची प्रथा होती. लिंगाणा किल्ला रायगडचा पूरक होता. त्याच्या डागडुजीचे काम रायगडा बरोबर चालत असे. १७८६ सालापर्यंत त्यावरील वास्तूंची देखभाल केली जात असे असा उल्लेख आढळतो. त्यामध्ये गडावरील सदर, बुरूज, दरवाजे आणि धान्यकोठार यांचा समावेश असे.तेथे पर्जन्यकाळात एक मनुष्य गस्त घाली. रायगड नंतर लिंगाणा पडला. रायगडाच्या खोऱ्यात थोडी विश्रांती घेऊन इंग्रजांचे विजयी सैन्य २३ मे रोजी पाली पलीकडील मार्गास लागले.

पाहण्यासारखे
मोहरी नावाच्या सह्याद्रिमाथ्यावरील गावातून बोराट्याची नाळ (दोन डोंगरांमधील अरुंद वाट) जवळ आहे. ही नाळ चालत जायला बरीच अवघड आहे. येथून जवळच असणाऱ्या रायलिंगहून लिंगाण्याचे दर्शन होते. सिंगापूर या नाळेने जाणे त्या मानाने सोपे आहे. लिंगाण्यावर जाण्यासाठी आधी लिंगणमाचीला जाऊन जननीचे आणि सोमजाईचे दर्शन घेऊन मग लिंगाण्याकडे निघतात. उजवीकडे पाण्याचे एक टाके आहे. पुढील वाट कड्याच्या अगदी टोकावरून जाते. येथे खालून येणारी पायऱ्या ढासळलेली एक वाट आहे. उजव्या बाजूस १५-२० फुटांचा कडा आहे, तिथे एक उंबराचे झाड कडा फोडून बाहेर आले आहे. त्याचाच आधार घेऊन कडा पार करावा लागतो. येथून वर गेल्यावर मग लिंगाण्याच्या त्या उंचावत गेलेल्या शिखराचा तळ आहे. त्याच्या पोटात एक गुहा आहे, तिला सदर म्हणतात. सदरेला एक प्रवेशद्वार आणि चार खिडक्या आहेत. त्या गुहेला लागूनच एक धान्याचे कोठार असून, पलीकडे जीभीचा पहारा आहे. तिथून माची पसरत गेली आहे.गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे सामावून घेते. समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्र्वर आपल्याला दर्शन होते. या गुहेवरून पुढे गेल्यावर एक कोरडा हौद व त्यानंतर पुढे चांगल्या पाण्याच्या हौद. इथे एक शिवलिंग आहे, पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही. या हौदाच्या पुढे, म्हणजे गडाच्या उत्तरेस पायऱ्या आहेत त्याने वर असलेल्या गुहांपर्यंत जाता येते.

इकडे आपल्याला एक शाबूत बांधकाम नजरेस पडते. ग्रामस्थांच्या सांगण्याप्रमाणे इथे दिवा लावत असत, जो कदाचित रायगडावर इशारा देण्यास वापरला जात असे. पण आज ही वाट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. जाण्याऱ्या वाटेवरूनच ही वास्तू दिसते.लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायची वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येते. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३-४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे. मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे, बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर वेगळाच आनंद मिळतो. अवघ्या १६ मिनीटांमधे दोर चा वापर न करता लिंगाना सुळक्यावर चढाई करण्याचा विक्रम शिलेदार सागर नलावडे या गिर्यारोहकाने केला आहे, या सुळक्याच्या पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे.गडाचे क्षेत्रफळ सुद्धा कमी, म्हणजे जवळ-जवळ २५० चौरस मीटर इतकेच आहे. उत्तरेस ज्या पायऱ्या आहेत त्या टाक्यांकडे नेतात. ती वाटही बिकट झाली आहे. आजमितीस ज्या टाक्यातून पाणी भरले जाते तिथे एक शिवलिंग आहे, ते कुठून आले हा प्रश्र्न पडतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu