धोडप किला (Dhodap Fort)

Like
Like Love Haha Wow Sad Angry

धोडप किला

धोडप हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात असलेल्या नाशिक या जिल्हयातील एक किल्ला आहे.मध्यभागातून जाणारी सह्याद्रीची पूर्वपश्चिम डोंगररांग म्हणजे अजंठा-सातमाळा ही होय. अजंठा-सातमाळा रांग म्हणजे गिरीदुर्गाची साखळी आहे. या साखळीमधील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजे धोडप हा होय. शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारामुळे दूरवरुन स्पष्टपणे ओळखू येतो.राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे. येथेच त्यांची दिलजमाई झाली होती.छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटल्या नंतर खजिना पाहण्या साठी ह्या किल्ल्याला भेट दिली. पुढे इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्याकडून जिंकून घेतला. धोडप किल्ल्याची इतर नावे धुडप, धरब, धारब आहेत.हा शिलालेख धोडप किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याच्या डावीकडील भिंतीवर आहे. शिलालेख फारशी लिपी व भाषेत असून हिजरी १०४६ मोहरम महिन्याच्या २५ व्या दिवसाचा उल्लेख त्यात आहे, आणि “दुसरा शूर शहाजहान बादशहा, त्याचा नम्र सेवक अलावर्दी खान तुर्कमान, तसेच त्यांचे इतर चौदा किल्ले चार महिन्यात जिंकल्याचा उल्लेख त्यात आहे. चौदा किल्ल्यात धोडप ,चांदोर (चांदवड), इंद्राई, राजदेहर, कोळदेहर, कांचना, मांचना , कण्हेरा, जोला (जवळ्या), रोला( रवळ्या), मार्कांड्या, अहिवंत, अचलगड, रामसेज यांचा समावेश आहे.

गडावरील ठिकाणे
हा सुळका उजव्या बाजूला ठेवून आपण मळलेल्या वाटेने सुळक्याच्या खाली असलेल्या गुहेमध्ये पोहोचतो. यातील एका गुहेत पिण्यायोग्य पाणी आहे. दुसर्‍या गुहेत एक मंदिर आहे. ही जागा मुक्कामाच्यादृष्टीने योग्य आहे. गुहेच्या पुढे सरळ गेल्यावर निमुळती होत जाणारी कातळभिंत आहे. या अरुंद भिंतीला मधेच तोडण्यात आले आहे. पन्नास फूट खोली आणि पस्तीस फुटांची लांबी असलेला मधला भाग छन्नीने कोरुन काढलेला आहे. त्यामुळे त्या बाजूने कोणी शत्रू येथपर्यंत पोहचू नये अशी ही व्यवस्था आहे. हा माचीसारखा भाग मोकळा असून उंचावर असल्यामुळे येथून गडाचा परिसर तसेच धोडपचा वरचा सुळका उत्तम प्रकारे दिसतो. येथून चांदवड, इंद्राई, साडेतीन रोडगा, राजदेहेट, कांचन मंचन, विखारा, कन्हेरा, खळ्याजवळ्या, सप्तश्रृंगी, अहीवंतगड, अचला अशी सातमाळा रांग पहायला मिळते. दक्षिणेकडील विस्तृतप्रदेश न्याहाळता येतो. तसेच उत्तरेकडील साल्हेर सालोटा तसेच चौल्हेरचेही दर्शन होते. साधारण २५ किल्ले तरी धोडपवरुन दिसतात. वरील सुळक्याच्या मागील बाजूस एक मोठी मानवनिर्मित गुहा व काही पाण्याची टाकी आहेत. सुळक्याला फेरी मारता येते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories