अजिंक्यतारा
इतिहास
सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. सातार्याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसर्या भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स.१५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी हिला किश्वरखान याने येथे कैद करून ठेवले होते.या किल्ल्याचा उपयोग स्तरावरच्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला जात असे. छत्रपतीशिवाजीमहाराजांच्या राज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला.छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर दोन महीने वास्तव्यास होते. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजीमहाराजांच्या मृत्यू नंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने सातार्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणार्या मोग लांवर ढासळला व दीड हजार मुघल सैन्य मारले गेले.
किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण आझमतारा झाले तारा राणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर अजिंक्यतारा केले.पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वत राज्याभिषेक करून घेतला. मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छ.शाहूंनी सातारा शहराची स्थापना यावेळी केली. दुसर्या शाहूच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेला अजिंक्यतारा हा मराठ्यांच्या हाती १६७३ मध्ये आला. त्या अगोदर गडावर अनेक राज्यकर्त्यांनी आपले आधिपत्य गाजवले होते. शिवाजी महाराज हे या गडावर जवळपास ६० दिवस वास्तव्यास होते. परंतु कालांतराने आक्रमण होऊन कधी मुघल तर कधी इंग्रज असे अनेक सत्तापालट या गडाने पहिल्यात.मध्यंतरी गडाचे नामकरण आझामतारा असे करण्यात आले. परंतु ताराराणीच्या सैन्याने किल्ला जिंकून अजिंक्यताऱ्याला पुन्हा आपले गत वैभव प्राप्त करून दिले. इतके सर्व बदल होऊनही न खचता, न डगमगता आजही अजिंक्यतारा आपल्या नावाप्रमाणे एखाद्या ताऱ्यासारखा चमकत डौलाने उभा आहे.
अजिंक्यतारा किल्ल्यांवरची पाहण्या सारखी ठिकाणे
सातारा जिल्ह्याचे नाव हे तिथे असणाऱ्या सात किल्ल्यांवरून पडल्याचे समजते. यांपैकी एक महत्वाचा किल्ला म्हणजे अजिंक्यतारा. या किल्ल्यावर आणि आजूबाजूला अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. गडाचा भला मोठा दरवाजा हा शिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. या दरवाज्याला दोन्ही बाजूंनी असणारे बुरुज आजमितीला देखील अगदी सुव्यवस्थित आहेत. गडाला उत्तरेला दोन दरवाजे आहेत. शिवाय गडकोट आणि भिंती भक्कमपणे उभे आहेत.हनुमानाचे मंदिर, महादेवाचे मंदिर, ताराबाईंचा ढासाळलेल्या स्थितीत असलेला राज वाडा, मंगळादेवीचे मंदिर आणि मंगळाईचा बुरुज पाहण्यासारखे आहे. किल्ल्यावरून समोरच नंदगिरी, चंदन-वंदन किल्ले, सज्जनगड, कल्याणगड, जरंडा या किल्ल्यांचे दर्शन आपल्याला घडते. गडावर उभं राहून आपण संपूर्ण सातारा शहराचे दर्शन करू शकतो. अजिंक्यतारा हा गिर्यारोहकांच्या पसंतीचा गड आहे. शिवाय चढायला सोपा असल्याने नवीन गिर्यारोहक येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. महिन्या हजारो पर्यटक आणि निसर्गप्रेमी हे येथे भेट देतात. जर आपण दुर्गप्रेमी आहात तर अजिंक्यतारा हा आपल्यासाठी एक उत्तम असा पर्याय आहे.
सातार्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजाचे दोन्ही बुरूज आज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे. मात्र गडावर पाण्याची सोय नाही. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसार भारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसारभारती केंद्राचे दोन टॉवर आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व ‘मंगळादेवी मंदिरा कडे’ असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे मंदिराकडे जाताना तीन तळी वाटेत लागतात. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मदिर लागते.मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिरा च्या आवारा अनेक शिल्पे आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडा ला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या उत्तरेला देखील दोन दरवाजे आहेत. ते तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात एकातही पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्यामार्गाने खाली उतरावे लागते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो.तसेच दक्षिण दिशेला निनाम(पाङळी) हे गाव आहे. या गावात एक पुरातन (इ.स. १७००) मधील कोल्हापूरच्या (रत्नागिरीवाङी) जोतिबाचे देऊळ आहे. तसेच गावा लगत ङोंगर आहे. तेथे पांडवगळ नावाचे एक पुराणकालीन प्रेक्षणीय स्थळ आहे व या गावाच्या पशिम दिशेला तलाव आहे.संपूर्ण गड बघण्या साठी साधार दीड तास लागतो. गडावरून मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा शहराचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते. जर आपण निसर्गप्रेमी असाल तर वर्षा ऋतूच्या सुरुवातीनंतर आपण या ठिकाणी येऊन अजिंक्यतारा किल्ल्याची सुंदरता बघू शकता.