४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस

Like
Like Love Haha Wow Sad Angry

जागतिक कर्करोग दिवस

कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे.पॅरिस येथे सन २००० मध्ये झालेल्या जागतिक परिषदेत कर्करोगविषयक मसुदा (World Summit Against Cancer) मांडण्यात आला. अशा प्रकारचा विषय हाताळणारी ही पहिलीच परिषद ठरली. या परिषदेत जगभरातील शासकीय उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्करोगविषयक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी पॅरिसच्या कर्करोगविषयक सनदेला मान्यता दिली. प्रस्तुत सनद कर्करोगसंबंधित संशोधन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याकरिता आर्थिक गुंतवणूक करणे, कर्करोगग्रस्त रूग्णांचे जीवनमूल्य उंचावणे तसेच त्यांना योग्य उपचार देणे अशा तत्त्वांचा पुरस्कार करते. सनदेच्या दहाव्या कलमात अधिकृतरीत्या ४ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिवस’ म्हणून जाहीर केला गेला.कॅन्सरविरोधात (Cancer) एकत्रितपणे लढाई लढण्यासाठी दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिवस’ (World Cancer Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे, कॅन्सरबाबत अधिक जागरुकता निर्माण करणं हा आहे. १९३३ मध्ये आंतराष्ट्रीय कॅन्सर नियंत्रण संघाने स्विझरलँडमधील जिनेवा शहरात पहिल्यांदा जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यात आला होता.जगात कॅन्सरमुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. हा शरीरातील पेशींमध्ये वेगाने पसरणारा आजार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात दरवर्षी ७६ लाख लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो. कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांमध्ये ४० लाखांहून अधिक लोक ३० ते ६९ वयोगटातील असल्याची माहिती आहे. एका अंदाजानुसार, २०२५ पर्यंत, कॅन्सरमुळे वेळेआधीच मृत्यू होणाऱ्यांच्या आकड्यात वाढ होऊन तो दरवर्षी ६० लाखांपर्यंत पोहचू शकतो. कॅन्सरबाबत अनेकांमध्ये गैरसमज आहेत. देशातील अनेक डॉक्टरांनी, समजूतीने आणि काही गोष्टी टाळून कॅन्सरपासून बचाव केला जाऊ शकत असल्याचं सांगितलं आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories