विजयदुर्ग किल्ला
सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग हा सर्वात जुना किल्ला आहे. हा मराठा राजवटीतील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. इथे सैन्याची सर्व जहाजांचे नांगर टाकण्यासाठीचं महत्त्वपूर्ण बंदर होतं. या किल्ल्याला इस्टर्न गिब्राल्टर असं बिरूदही देण्यात आलं होतं. कारण हा किल्ला जिंकण केवळ अशक्यप्राय होतं. या किल्ल्यावरही बऱ्याच लढाया झाल्या. १८१८ पर्यंत म्हणजेच तब्बल १६५ वर्ष हा किल्ला मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता. या किल्ल्याला एकुण २० बुरूज आहेत. पण आजही हा किल्ला अभेद्य आहे. इथे भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑगस्ट महिन्यातील वर्ल्ड हेलियम डे हा आहे.
इतिहास
विजयदुर्ग किल्ला एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. विजयदुर्ग किल्ला विजय किल्ला म्हणूनही ओळखला जातो. १७ व्या शतकात शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या भिंती, अनेक बुरुज आणि मोठ्या इमारतींच्या तिहेरी इमारतीसह भव्य सुविधा जोडून किल्ल्याचे मजबुतीकरण केले.हा किल्ला आदिल शहाच्या ताब्यात होता तेव्हा त्याचे नाव “घाहरिया” होते. १६५३ मध्ये मराठा साम्राज्याचा राजा शिवाजी महाराजांनी आदिल शहा कडून हा किल्ला जिंकला आणि त्यास “विजयदुर्ग” असे नाव दिले. आधी हा किल्ला 5 एकर क्षेत्रात पसरलेला होता आणि चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला होता. किल्ला ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी १७ एकर जागेवर गडाचा विस्तार केला. प्रवेशद्वारासमोर एक अंतर होते जेणेकरून सामान्य लोक किल्ल्यात जाऊ शकणार नाहीत. तरीही ब्रिटीश, पोर्तुगीज आणि डच हल्ले सुरूच होते. तथापि, १७५६ पर्यंत हा गड मराठ्यांच्या ताब्यात होता.पण १७५६ मध्ये हा किल्ला हरवला, जेव्हा इंग्रज आणि पेशवे यांनी एकत्रितपणे किल्ल्यावर हल्ला केला.
विजयदुर्ग किल्ल्याची रचना
विजयदुर्गचा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असलेला भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुना किल्ला आहे. 40 कि.मी.च्या आखातीमुळे हा किल्ला ताब्यात घेणे फारच अवघड होते, जहाजांसाठी नैसर्गिक अडथळा म्हणून काम करत असत व किल्ल्याच्या रक्षणासाठी वापरत असे. या खाडीत मराठा युद्धनौका लावलेली होती. जेणेकरून खोल समुद्रातून शत्रू त्यांना पाहू शकणार नाही.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा म्हणून काम करणारा वाघोतन नदीजवळ हा किल्ला आहे. हा किल्ला मजबूत प्राचीन वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. किल्ल्याचा राजा भोज शिलाहार वंश यांनी हा 1193 ते 1205 च्या दरम्यान हा किल्ला बांधला गेला.
विजयदुर्गाचे रहस्य
एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी तीन युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडिमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. त्याअनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायाचा त्यांचा मनसुबा होता पण, एकेक करून तीनही युद्धनौका बुडाल्या. याच कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली किल्ल्याचं शत्रूंकडून संरक्षण करण्यासाठी. हि भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटीतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाजं गलबतं-मचवे वगैरे ह्या भिंती वरून सहज ये-जा करत. कारण त्यांचे तळ, उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्यांची जहाजं गडाजवळ येऊन या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जातं. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळं विजयदुर्ग अभेद्य राहीला. सदर भिंत हि शिवरायांच्या कारकिर्दीत बांधल्याच्या तथ्याला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्रफीतील तज्ञांनी दुजोरा दिला
पहाण्याची ठिकाणे
वाडी चौल्हेर गावाच्या मागे चौल्हेर किल्ला आहे. गावातून गडावर जाण्यासाठी दोन टेकड्या पार कराव्या लागतात. गावा जवळील टेकडीच्या पायथ्याशी एक कमान उभारलेली आहे. या टेकडीवर चढून जाण्यास १० मिनिटे लागतात. या टेकडीवर वनखात्याने पर्यटकांसाठी सिमेंटचे विश्रांतीस्थान बांधलेली आहेत. या टेकडीच्या समोरील डोंगराच्या डाव्या बाहूने वळसा घालून एक ठळक पायवाट जाते. दरी उजवीकडे आणि डोंगर डावीकडे ठेवत या पायवाटेने २० मिनिटात आपण किल्ल्याच्या डोंगरा समोरील छोट्याश्या पठारावर पोहोचतो. येथून समोरच किल्ल्याचा बुरुज दिसतो. पठारावरुन वाट खाली उतरते आणि किल्ल्याच्या डोंगराला लागते. या वाटेवर भरपूर घसारा (स्क्री) आहे. किल्ल्याचा डोंगर डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत किल्ला चढायला सुरुवात करावी. साधारणपणे अर्ध्या तासात आपण रेलिंगपाशी पोहोचतो. याठिकाणी रेलिंग लावून दरीकडील बाजू सुरक्षित केलेली आहे. रेलींग संपल्यावर कातळात खोदलेल्या पायर्या लागतात. त्या पायर्या पार केल्या की आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या खाली पोहोचतो.
प्रवेशद्वाराकडे जाणार्या कातळात कोरलेल्या पायर्यांच्या वरच्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर वाट काटकोनात वळते . काही पायर्या चढल्यावर दुसरा दरवाजा आहे. पुन्हा वाट काटकोनात वळते तेथे तिसरा दरवाजा आहे. पायर्या चढून वर गेल्यावर चौथा दरवाजा लागतो. हे सर्व दरवाजे अशा प्रकारे बांधलेले आहेत की या प्रवेशद्वार संकुलात फ़ारसा प्रकाश येणार नाही. त्यामुळेच या दरवाजांचा भूयारी दरवाजे असा उल्लेख केलेला आढळतो. चौथ्या दरवाजातून बाहेर पडल्यावर आपला माचीवर प्रवेश होतो. उजव्या बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. त्याच्या पुढे पाचवा दरवाजा होता पण आज तो अस्तित्वात नाही. या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर एक पूर्ण झिजलेली मुर्ती आहे. दरवाजा समोरुन गड माथ्यावर जाणारी वाट आहे . तर उजव्या बाजूला पिंड, नंदी आणि मंदिराच्या खांबाचे अवशेष उघड्यावर ठेवलेले आहेत. या अवशेषांच्या पुढे टोकावर जाऊन खाली पाहिल्यावर एक टाक दिसते. हे सर्व अवशेष पाहून गडमाथ्याकडे न जाता विरुध्द बाजूला जावे. याठिकाणी लांबलचक पसरलेले पठार आहे. मध्यभागी एक उंचवटा आहे. त्यावर वास्तूचे अवशेष आहेत. या उंचवट्या खाली उजव्या बाजूला पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या पुढे पठाराच्या टोकाला बुरुज आहे. किल्ल्यावर येण्याच्या वाटेवरुन हाच बुरुज आपल्याला सतत दिसत असतो.
किल्ल्याच्या माचीवरुन परत फ़िरुन प्रवेशद्वारापाशी येऊन गड माथ्याच्या दिशेने चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल्या पायर्या लागतात. पायर्या चढून गेल्यावर समोरच एक पत्र्याची शेड लागते. त्या ठिकाणी एका साधूचे वास्तव्य आहे. या भागातून गडमाथ्याला पूर्ण फ़ेरी मारता येते. शेडच्या पुढे एक सिमेंटने बांधलेले चौरंगीनाथांचे मंदीर आहे. त्यात हनुमानाची मुर्ती आणि इतर झिजलेल्या मुर्ती आहेत. मंदिराच्या पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. टाक्याच्या खालच्या बाजूला एक बुरुज आहे. टाक्याच्या वरच्या बाजूला चढून गेल्यावर गड माथ्याच्या कातळटोपी खाली पाण्यचे प्रचंड मोठे टाके आहे. सध्या त्यात दगड पडून ते भरलेले आहे. इथून पुढे जाणारी वाट ढासळलेली असल्याने पुन्हा चौरंगीनाथ मंदिरापाशी यावे. इथून समोर किल्लाची माची दिसते. त्या माचीच्या खालच्या अंगाला एक टाके खोदलेले आहे. चौरंगीनाथ मंदिराच्या पुढे असलेल्या साधूच्या कुटीच्या पुढे पायवाट गड माथ्यावर चढत कातळभिंतीपाशी येते. इथे उजव्या बाजूला मोती टाके आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. मोती टाके पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर कातळात कोरलेली दोन टाकी बाजूबाजूला आहेत. टाक्यांच्या पुढे गडमाथ्यावर (बाले किल्ल्यावर) जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायर्या आहेत. या पायर्या चढून गेल्यावर उध्वस्त प्रवेशद्वारातून आपला गडावर प्रवेश होतो. प्रवेशद्वाराचे नक्षीदार दगड तिथे विखूरलेले पाहायला मिळतात. गडमाथ्यावर डाव्या बाजूला एक वास्तू आहे. त्याच्या तळघरात धान्य कोठार आहे. त्याच्या बाजूला वास्तूचा चोर दरवाजा आहे. ही मोठी वास्तू पाहून गडमाथ्यावर आल्यावर इतरही काही उध्वस्त वास्तू दिसतात. पण त्यात माजलेल्या झाडझाडोर्यामुळे आणि निवडुंगामुळे वास्तूत प्रवेश करता येत नाही. गडमाथ्यावर मध्यभागी कातळात कोरलेली पाण्याची टाकी आहेत. टाक्यांजवळ असलेल्या उंचवट्यावर ध्वजस्तंभ लावलेला आहे. बालेकिल्ल्याच्या तटबंदीला असलेल्या दुसर्या दरवाजातून आपण बाहेर पडतो आणि बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो . याठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण गड फिरण्यास दोन तास पुरतात.