तांदुळवाडी किल्ला
इतिहास
या गडाचा इतिहास संक्षिप्त स्वरुपात ठाणे गॅझेटिअर्स मध्ये पाहावयास मिळतो. तो येणेप्रमाणे तांदुळवाडी किल्ला माहीमच्या (केळवे माहीम) आग्नेय दिशेस सुमारे १६ किमी अंतरावर असून हे स्थान ५७९ मीटर्स (सुमारे १९०० फूट) उंचीच्या डोंगरावर आहे. सफाळे रेल्वे स्टेशनच्या ईशान्येस ४.८० किमी अंतरावर हा किल्ला आहे. मराठ्यांनी इ.स. १७३७ साली हा किल्ला हस्तगत केला होता. या डोंगरमाथ्यावर पाषाणात खोदलेली अनेक पाण्याची टाकी, जलकुंभ असून तटबंदीच्या खुणाही आढळतात. डोंगराच्या पूर्व पायथ्याजवळून वैतरणा नदी वाहते. नदीशेजारीच ललठाणे नावाचे खेडे वसलेले आहे. गावाजवळच जलसंचयिका असून ती पोर्तुगीजांनी बांधली असावी.तेराव्या शतकात राजा भीमदेव याचे राज्य समुद्राकाठी शूर्पारक (नालासोपारा), महिकावती(माहीम) येथे होते. पुढे इ.स. १४५४ साली अहमदाबादच्या सुलतानाने महिकावती सर केले. त्यांच्यापैकी एका बहादूरशहाने मलिक अल्लाउद्दीन नावाच्या सरदाराला तांदुळवाडीचा किल्लेदार केले. त्यानंतर या भागावर पोर्तुगीजांनी अंमल बसविला. पेशव्यांच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या हातात आला.
भौगोलिक स्थान संपादन करा हे गाव सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस ७ किमी अंतरावर वसलेले आहे.हवामान संपादन करा पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस पडतो आणि काही ठिकाणी तो साचून राहतो. उन्हाळ्यात येथील हवामान फारच उष्ण असते. हिवाळ्यात सकाळी भरपूर धुके पडलेले असते व हवामान अत्यंत आल्हाददायक शीतल असते.लोकजीवन संपादन करा येथे शेती करणारे कुणबी तसेच जंगलात काम करणारे आदिवासी समाजातील लोक वर्षानुवर्षे राहत आहेत. गावात प्राथमिक शाळा आहे. जवळच असलेल्या डोंगरावर तांदुळवाडी किल्ला आहे.सार्वजनिक स्वच्छता, रस्तेवीज, पाणी पुरवठा, आरोग्य इत्यादी ग्रामपंचायतीमार्फत पुरविल्या जातात. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.जवळपासची ठिकाणे संपादन करा तांदुळवाडी गड-किल्ला वैतरणा नदी, पारगाव पूल, तांदुळवाडी डोंगर, साईबाबा मंदिर
पहाण्याची ठिकाणे
पायथ्यापासून गडावर चढून गेल्यावर दगडांनी रचलेली तुटक अशी चार फूट उंचीची तटबंदी आहे. या तटबंदीच्या दिशेने पुढे गेल्यास गडाच्या मध्यभागी चौकोनी हौद दिसतो. भिंत उजवीकडे ठेवत, तिच्या बाजूने थोडे खाली उतरल्यावर पश्चिम टोकाकडून येणारी वाट दिसते. या वाटेवरून पुढे गडाच्या पूर्व व पश्चिम कड्यापाशी खडकात खोदलेली पाण्याची सुमारे पंचवीस कुंडे किल्ल्याचे अस्तित्व दर्शवितात. गडावरुन आजूबाजूचा परिसर दिसतो. या गडावरील रानात विविध जातींची वृक्षवेली, वनौषधी व अनेक जातींचे पशुपक्षी आढळतात.