कंक्राळा किल्ला
नाशिक जिल्ह्यात सीमेवर मालेगाव तालुक्यात एक किल्ला आहे, याचे नाव कंक्राळा किल्ला. गाळणा किल्ल्याचा सखा सोबती हा कंक्राळा किल्ला. मालेगावच्या उत्तरेकडच्या भागात गाळणा टेकड्या पसरलेल्या आहेत. या थेट धुळ्यापर्यंत पसरलेल्या टेकड्यांवरच या परिसरातले काही मोजके किल्ले बांधलेले दिसून येतात. त्यापैकीच गाळणा किल्ल्याचा सखासोबती असलेला हा कंक्राळा किल्ला होय. गाळणा किल्ल्याच्या नैऋत्येला कंक्राळा किल्ला उभा आहे. मालेगाव परिसराच्या भटकंती दरम्यान गाळण्याच्या किल्ल्याबरोबरच कंक्राळ्याची भेट ही अनोखी ठरते. या किल्याची उंची अंदाजे 2400 फूट इतकी असून हा गिरीदुर्ग आहे
गडावरील पहाण्याची ठिकाणे
खिंडीच्या अलिकडे उजव्या बाजूच्या कातळ भिंती मध्ये एक सुस्वर असे पाण्याचे टाके आहे. याच्याच जवळ झाडावर एक भगवा ध्वज देखील फडकत असतो. खिंड ही कंक्राळ्याच्या डोंगरामुळेच तयार झालेली असल्यामुळे या खिंडीत तटबंदीचे अवशेष दिसतात. ही तटबंदी आता मात्र बर्याच मोठ्या प्रमाणावर ढासळलेली आहे. तटबंदीच्याच वरच्या भागात पाण्याची एक ते दोन टाकी आढळतात. संपूर्ण गडमाथ्यावर पाण्याची टाकी बरीच आहेत. काही ठिकाणी वाड्यांचे चौथरे दिसतात. एका ठिकाणी उघड्यावर हनुमानाची मूर्ती पडलेली दिसते. सर्व किल्ल्याचा सहल मारण्यास अर्धा तास पुरतो. कंक्राळ्याहून गाळण्याचा किल्ला समोरच दिसतो.