कण्हेरगड (Kanhergad)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

कण्हेरगड

औरंगजेबाच्या विधिवरून दिलेरखान याने मोगल सैन्यासह या किल्ल्यावर चढाई केला होता. त्या वेळी कण्हेरगडाचे किल्लेदार रामाजी पांगेरा हे होते. गडावर सुमारे सातशे मावळे होते. गडाला मोगल सैन्याने वेढा घातला होता. या वेढ्यावर अनपेक्षितपणे घाला चढवण्याची व्यूहरचना किल्लेदार रामाजी पांगेरा यांनी आखली. मदतीची वाट पाहणे शक्य होते पण मदत वेढा भेदून आत येणे अशक्य होते. मोगल सैन्य संख्येने अतिशय जास्त होते. या शिवाय किल्ला अतिशय उंच नव्हता. त्यामुळे मोगल सैन्याचा वेढा पूर्ण होण्याच्या आत घेर तोडले आणि सैन्य वाया घालवणे हा  हेतू त्यात होता. तसे झाले तर पळत असलेल्या मोगल सैन्याची लांडगेतोड करता आली असती.त्यामुळे पहाटेच्या अंधारात रामाजी पांगेरा यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी मोगलांच्या भल्यामोठ्या सैन्यावर चढाई केला. यावेळी फक्त ७०० मावळे रामाजींसोबत होते. अचानक पडलेल्या छाप्याने मोगल सैन्य घाबरले . सातशे मावळ्यांनी बाराशेच्यावर मोगल कापून काढले. पण तरीही संख्याबळाच्या जोरावर दिलेरखानाने पळणारे मोगल सैन्य थांबवले. मराठ्यांनी  धैर्य शिकस्त केली. संख्येने कमी असूनही मराठे मागे हटले नाही. सुमारे तीन तास कण्हेरगडाच्या परिसरात हे रणकंदन सुरू होते. रामाजी आणि त्याच्या मराठ्यांनी शौर्याची कमाल केली. प्रतिहल्ला झाल्यावर कोणतीही कुमक शिल्लक नसल्याने मावळ्यांनी स्वराज्यासाठी जीवन दिले. सभासदाची  लढाईविषयी लिहून ठेवलेले आहे, की “टिपरी जैसी सिमगीयाची दणाणते तैसे मराठे कडाडले.’ सिमगीयाची म्हणजे शिमगा या सणात जशी टिपरी हलगीवर अनेकदा कडाडते तसे मावळे तुटून पडले होते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu