इंद्राई किल्ला (Indrai Fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

इंद्राई किल्ला

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक डोंगररांग चालू होते आणि चांदवड पर्यंत येऊन थांबते . पुढे तीच मनमाडच्या जवळ असणार्‍या अंकाइ किल्ल्यापर्यंत जाते. याच रांगेला अजंठा – सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात ४ किल्ले येतात, राजधेर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड.छन्नी-हातोड्याची कलात्मकता, कातळकोरीव सौंदर्य, सातमाळापर्वतरांगेत कठीण स्थानपासून तब्बल 1370 मीटर उंची, सातवाहन स्थापत्यकलेचा अतुलनिय नमुना अशी नाना मानाची तुरे ज्याच्या शिरपेचात आहे असा दुर्गवीर इंद्राई किल्ला .

गडावरील पहाण्याची ठिकाणे
आपण कातळ भिंतीपाशी येऊन पोहोचतो. या कातळकड्यापाशी कातळात खोदलेल्या २ गुहा आहेत. यापैकी एका गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. हि कातळभिंत कोरुन गडावर जाण्याचा मार्ग बनविलेला आहे. याची रचना एका बाजूने कापलेल्या नळी सारखी आहे. या मार्गावरून चालतांना आपल्या माथ्यावर कातळभिंतीचे उच्च टोक आहे . या मार्गाने ५० पायर्‍या चढून गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे कातळ फोडून खिंडी सारखी रचना केलेली आहे. या मार्गाने अंदाजे १०० पायर्‍या चढून गेल्यावर प्रवेशद्वाराच्या अलिकडेच डाव्या बाजूच्या कातळात कोरलेला फारसीतील शिलालेख पाहायला मिळतो. गडाच्या प्रवेशद्वाराचे अवशेष केवळ  शिल्लक आहेत. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केरुन पुन्हा थोडी चढाइ केल्यावर समोरच्या बाजूस व उजवीकडे कातळात खोदलेल्या गुहा दिसतात. याच ठिकाणी तीन वाटा फूटतात. प्रथम उजवीकडची वाट पकडावी थोड्याच अंतरावर कातळात खोदलेल्या गुहांची रांग दिसते. येथून समोर राजधेर व डावीकडे कोळधेर किल्ला दिसतो. दूरवर धोडप, इखारा, कांचना, रवळ्या-जावळ्या इत्यादी किल्ले दिसतात. या सर्व गोष्टी पाहून परत मागे फिरावे. नंतर वर जाणारी वाट पकडावी. थोडे अंतर चढून बुजलेले पाण्याचे टाक आणि वास्तुचे अवषेश पाहायला मिळतात. येथून सरळ वर चढत जाणारी वाट गडाच्या सर्वोच्च टोकावर जाते. तर वास्तुच्या बाजुने खाली उतरणारी वाट पकडून गेल्यास कातळात खोदलेले महादेवाचे मंदिर लागते. मंदिरासमोर दगडात बांधून काढलेला तलाव आहे. मंदिराच्या बाजूला कातळात खोदलेली अरुंद गुहा आहे. मंदिरावरुन पुढे जाणार्‍या रास्ता नेहमी गडाच्या सर्वोच्च टोकावर जाता येते. महादेवाचे दर्शन घेऊन परत मागे फिरावे आणि आता डावीकडची वाट पकडावी. थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या १८ ते २० गुहांची रांग दिसते.या गुहांमध्ये कोण्त्याही प्रकारचे कोरीवकाम आढळत नाही. यापैंकी काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत. गुहेंच्या रांगेच्या शेवटी बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. येथून समोर २ शिखरे असलेला डोंगर दिसतो, त्याला दोन रोडग्यांचा डोंगर असे म्हणतात. या डोंगराच्या मागे नाशिक – धुळे महामार्ग आणि त्याच्या मागे चांदवड किल्ला दिसतो. पिण्याच्या पाण्याच्या टाक्याच्या बाजूला एक सुकलेले टाक आहे.पिण्याच्या पाण्याचे टाके व गुहंमधील कातळावर पायर्‍या खोदलेल्या आहेत. या पायर्‍या चढून डाव्या बाजूने गेल्यास आपण महादेवाच्या मंदिरा समोरील तळ्याजवळ पोहोचतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu