गोंड राजाचा किल्ला (Gond king’s fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

गोंड राजाचा किल्ला

भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर शहराच्या ’महाल’ या भागात असलेला हा किल्ला आहे.या किल्ल्याचे बांधकाम मजबुत होते. या किल्ल्याच्या सभोवताली पाण्याने भरलेले खंदक खोदण्यात आले होते. या किल्ल्यास उत्तरेच्या बाजुस एक दगडी कमान आहे. ते या किल्ल्याचे प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावर फारसी लिपीत कोरलेले आढळून येते. या द्वारातुन सुमारे ७० मीटर आत गेल्यावर एक लाकडाचे भव्य द्वार आहे. या लाकडाच्या भव्य द्वाराची जाडी सुमारे ७-८ सें.मी. असावी. हा जुना राजवाडा आहे. सध्या भग्नावस्थेत आहे. येथे लाकडी स्तंभांचे बांधकाम करण्यात आलेले होते. त्यावर गच्ची होती. हा किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे ७०० मीटर लांब आणि ५०० मीटर रुंद येवढे असावे. या राजवाड्याचे आत संगमरवरी बांधकामाचा एक फवारा आहे. तेथील गोंड राजाच्या वंशजांनी त्या राजाच्या वस्तु अद्यापही सांभाळुन ठेवल्या आहे.या किल्ल्याच्या सभोवताली अनेक बुरुज होते. त्यापैकी आज फक्त एकच बुरुज अस्तित्वात आहे. या बुरुजावर एक तोफ आहे. या तोफेवर मनुष्याची आकृती आहे. ती एका ओट्यावर ठेवलेली आहे. ती गोल फिरविता येण्याची व्यवस्था आहे. बादशहा शहाजहानने इ.स. १६३७ साली सुरुंग लावून तीन बुरुज उडविले. याचे कारण गोंड राजाने त्यास खंडणी दिली नव्हती. सन १७३२ साली हा प्रथम रघुजी भोसलेंनी आपल्या ताब्यात घेतला असे इतिहासकार सांगतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d