बितनगड / बितंगा/ बिताका (Bitangad Fort)
Like
Like Love Haha Wow Sad Angry

इतिहास

गडाचा तसा जास्त स्वराज्याच्या इतिहासात नामोल्लेख आढळत नाही परंतु एका पत्रात या गडाच्या पायथ्याच्या बितनवाडी गावाचा उल्लेख आढळतो. रहुल्ला खान २३ डिसेंबर १६८२ रोजी औरंगजेब बादशाहाला पत्र लिहितो त्यात तो म्हणतो कि शत्रूच्या किल्ल्याच्या पायथ्याचे बितनवाडी हे गाव आम्ही पेटवून दिले आहे आणि कदाचित याचा धाक शत्रूला बसेल. आता १६८२ च्या आसपास निजामशाही संपुष्टात आलेली होती त्यामुळे त्यांच्या ताब्यात तर हा किल्ला नक्की नव्हता, आदिलशाहीचा इकडे नगर भागात संबंध फार कमी आणि त्याकाळी औरंगजेबाचे खरे लढवय्ये शत्रू होते मराठे! त्यामुळे हा किल्ला स्वराज्याचा एक भाग होता हे नक्की समोर येते.किल्ल्याचा माथा बघता असे लक्षात येते कि या गडावर फक्त एखादी दुसरी तोफ असावी आणि याचा वापर जास्तीत जास्त टेहाळणी साठीच केला गेलेला असावा.बितनगड हा किल्ला कळसूबाईच्या डोंगर रांगेत पुर्वेला आहे. ह्या पूर्व रांगेत आणखीन असणारे किल्ले म्हणजे औंढा, पट्टा, आड आणि म्हसोबाचा डोंगर. बितनगड किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पूर्वेकडे कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाईचा डोंगर दिसतो. पहाण्याची ठिकाणे : किल्ल्याचा माथा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्यावर एक गुहा आणि एक पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. काही उध्वस्त वास्तु आहेत. किल्ल्यावरुन दिसणारा आजुबाजुचा परिसर, डोंगररांगा मनाला भुरळ घालतात. बितनगड किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पूर्वेकडे कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाईचा डोंगर दिसतो. बितनगड किल्ल्याचे राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) हुन छायाचित्र. बितनगड किल्ला हा सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेतील एक किल्ला आहे. तो राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) च्या पुर्वेला आहे. या किल्ल्याला बिताका ही म्हणतात. तो कळसुबाई व पट्टागड यांच्यामध्ये आहे. बितनगड किल्ला हा सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेतील एक किल्ला आहे. तो राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) च्या पुर्वेला आहे. या किल्ल्याला बिताका ही म्हणतात. तो कळसुबाई व पट्टागड यांच्यामध्ये आहे.

पहाण्याची ठिकाणे :
गडावर रेलिंग लावण्याआधी पायऱ्यांची वाट हि धोक्याची होती परंतु आता ती सुखकर झाल्याने तशी काही भीती नाही.बितनगड हा किल्ला कळसुबाई डोंगररांगेची उपरांग असलेल्या पट्टा डोंगररांगेतील शेवटचे टोक आहे असे म्हणले तरी काही वावगे ठरणार नाही. बितनवाडी गावामधून गडाकडे जाणारी पाऊल वाट सुरु होते, खुरट्या झाडीमधून वाट काढत आपल्याला गडाकडे जावे लागते. आपल्याला ज्या वाटेने जायचे आहे त्याच्या अगदी पाठीमागे आपल्याला पट्टा किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेचे दर्शन होते.पुढे थोडीशी चढाई केल्यानंतर आपल्याला गडाच्या बालेकिल्ल्याच्या पायऱ्या दिसायला लागतात. वाटेत आपल्याला पाण्याच्या टाक्यांचेही दर्शन घडते. पहिले पावसाळ्यात या पायऱ्यांवरून जाने तसे खूप धोक्याचे होते, तेव्हा ट्रेकर्स ग्रुप आपल्य्सोबत दोरी बाळगत परंतु आता या किल्ल्यावर वनविभागाने धोक्याची घंटा लक्षात घेता रेलिंग बसवल्या आहेत.

आपण या पायऱ्यांनी चढून वर गेल्यावर आपल्याला एक लेणी सदृश्य गुहा आहे. हि गुहा तशी भरपूर मोठी आहे, गडावर मुक्कामाच्या हेतूने येणार असाल तर इथे तुम्ही थांबू शकता. गुहेतून बाहेर आल्यावर आता आपल्याला गडमाथ्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. या वाटेने आपण गडाच्या छोटेखानी माथ्यावर जाऊन पोहोचतो. एका बाजूला आपल्याला बुरुजाची ढासळलेली वास्तू ओळखू देखील येणार नाही.गडावर तुम्हाला एक आरी सारखे निशाण दिसेल, ते म्हणजे त्या काळात गडावरील तोफांना दिशा देण्यासाठी असणारी आरी असावी असे काही लोक सांगतात. आता वनविभागाने माथ्यावर एक ओटा बांधलेला आहे. या ओट्याशेजारी एक निशानकाठी उभी केलेली आहे.गडावरील हे सर्व बघितल्यावर आता गडावरून दिसणाऱ्या बाकी निसर्गाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. पट्टा किल्ल्याच्या बाजूला आपल्याला धुके नसेल तर औंध आणि आड हे किल्ले देखील दिसतात. ट्रेकिंग विश्वातील एक त्रिकुट म्हणजेच अलंग-मदन-कुलंग यांचे दर्शन देखील घडते. हे सर्व विहंगम दृश्य बघून आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागू शकतो.किल्ल्याचा माथा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्यावर एक गुहा आणि एक पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. काही उध्वस्त वास्तु आहेत. किल्ल्यावरुन दिसणारा आजुबाजुचा परिसर, डोंगररांगा मनाला भुरळ घालतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu