विश्वास




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

किती छोटा शब्द ना जो श्वासाप्रमाणे जपणे आवश्यक आहे तोच विश्वास असतो, आणि म्हणूनच त्याला वि-श्वास म्हणत असावे कदाचित जशी श्वासाची हमी नाही कि तो केव्हा बंद होईल तसेच हल्ली विश्वासाचे झालेले आहे, कोण कधी तुमचा विश्वास तोडेल याचा ही काहीच नेम नाही. आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो म्हणजे काय करतो, तर ही व्यक्ती मला कधीच फसवणार नाही, कधी आणि कुठल्याच परिस्थितीत दगा देणार नाही, याची आपल्या मनाशी खुणगाठ बांधून ठेवतो, आपण विश्वास ठेवतो म्हणजे आपण समोरच्याच्य तुम्ही जेव्हा या जगाचा निरोप घ्याल तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या अशा व्यक्तीची संख्या मोजा, ज्यांनी तुम्ही विश्वास हे विविध वस्तूंशी, व्यक्तींशी, अन्य प्राण्यांशी, विचारप्रणालींशी, मूल्यांशी, तत्त्वांशी किंवा अद्‌भूत, कल्पित मानल्या जाणाऱ्या विषयांशीही जडणारे भावनात्मक नाते आहे. ‘ईश्वराच्या अस्तित्वावर माझा विश्वास आहे’, ‘त्या माणसाच्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास आहे’, ‘तुम्ही निश्चितपणे विजयी व्हाल, असा मला विश्वास वाटतो’, अशी वा अशा प्रकारची विधाने दैनंदिन जीवनात आपण अनेकदा ऐकतो. त्यांचा आशय लक्षात घेतला, तर ‘विश्वास’ ह्या शब्दाचा अर्थ ‘खात्री’, ‘श्रद्धा’ ह्या शब्दांच्या अर्थाजवळ येतो, असे दिसून येईल. विशेषत: ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला ‘श्रद्धा’ हाच शब्द सामान्यत: वापरला जातो.

विश्वास निर्माण करणारे काही घटक व्यक्तिमनाच्या बाहेरचे, तर काही व्यक्तीमनातले असतात. व्यक्तिमनाच्या बाहेरचे जे घटक असतात, त्यांत निरनिराळ्या स्त्रोतांपासून मिळालेली माहिती हा घटक विशेष महत्त्वाचा होय. उदा., दूरदर्शन, नभोवाणी, वर्तमानपत्रे ह्यांसारख्या प्रसारमाध्यमांतून जे संदेश पुन्हा पुन्हा दिले जातात, ते त्यांच्या प्रभावी सूचनक्षमतेमुळे त्यांच्यावरील विश्वास उत्पन्न करतात. उदा., दूरदर्शनवरील विविध उत्पादनांच्या जाहिराती. त्या पाहून ती उत्पादने अत्यंत दर्जेदार आणि खात्रीलायक गुणवत्तेची असली पाहिजेत असा विश्वास कित्येकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. तसेच वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेली वृत्तेही शंभर टक्के विश्वसनीय म्हणून अनेक लोक स्वीकारीत असतात.

प्रत्यक्ष अनुभवामुळेही विश्वास निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणावरील इतरांचा विश्वास हा त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचा नेहमीच अनुभव येत गेल्यामुळे निर्माण झालेला असतो. अशा व्यक्तींनी पुरविलेल्या माहितीवरही विश्वास टाकला जातो. तथापि कधी कधी वृत्त पुरविणारी व्यक्ती वा माध्यम खात्रीलायक नसतेही. परंतु त्या स्त्रोतापासून वा सूत्रापासून मिळालेली माहिती ज्यांच्या सोयीची असते, त्यांचा तिच्यावर त्वरित विश्वास बसतो. काही व्यक्तींची एक विशिष्ट प्रतिमा निरनिराळ्या प्रसारमाध्यमांतून निर्माण करण्यात आलेली असते. त्या व्यक्ती प्रत्यक्षात कशा आहेत, ह्याचा काहीच अनुभव नसताना तीच प्रतिमा विश्वासार्ह म्हणून स्वीकारण्याची सर्वसामान्य माणसांची वृत्ती असते. एखादी राजकीय विचारप्रणालीही प्रसारमाध्यमांद्वारे केल्या जाणाऱ्या परिणामकारक प्रचारातून लोकहिताची कशी आहे हे दाखवून तिच्यासंबंधी लोकांचा विश्वास निर्माण केला जातो.

अनेक लोक दीर्घकाळ जे करीत आले, ते इष्टच असले पाहिजे ह्या विश्वासामुळेच अनेक पारंपरिक चालीरीती कोणतीही चिकित्सा न करता स्वीकारल्या जातात. धर्मग्रंथांतील प्रत्येक वचनावरील विश्वास हा ह्याच पद्धतीने निर्माण झालेला असतो.

विश्वास निर्माण करणारे काही घटक व्यक्तिमनाच्या बाहेर जसे असतात, तसे काही व्यक्तिमनातही असतात. आपल्या परिसरातील घटकांना सर्व व्यक्ती सारख्याच पद्धतीने प्रतिक्रिया देत नाहीत. व्यक्तीचे वय, तिची मानसिक वाढ, तिचा अनुभव, तिच्या व्यक्तिमत्वातील परिपक्वता अशा अनेक घटकांवर त्या – त्या व्यक्तीची प्रतिक्रिया अवलंबून असते. त्यामुळे विविध व्यक्तींच्या विश्वासांचे जगही वेगवेगळे असते. उदा., आईवडील, शिक्षक ह्यांची मते लहान मुले चिकित्सा न करता खरी म्हणून विश्वासाने स्वीकारतात. त्याचप्रमाणे विचार करण्याची जबाबदारी टाळणारे काही प्रौढही इतर जे काही सांगतात, ते सर्व विश्वासार्ह मानून त्यांच्या मतांवर विश्वासाने अवलंबून राहतात. मानसिक रूग्णांच्या मनात वस्तुस्थितीशी विसंगत अशा प्रकारचे अनेक विश्वास निर्माण होतात. तथापि ह्या प्रकारच्या विश्वासाला संभ्रम ही संज्ञा योग्य ठरते. काही मनोविकृत स्वतःला राजा, सर्वसत्तावंत, परमेश्वर मानतात. तर काही मनोरूग्ण स्वतःला पापी, गुन्हेगार समजतात.

विश्वास ठेवणे आणि शास्त्रीय पुराव्यांनी सिद्ध झालेल्या वस्तुस्थितीचा स्वीकार करणे ह्यांत फरक करावा लागेल. उदा., ‘पृथ्वी गोल आहे, ह्यावर माझा विश्वास आहे’ असे म्हणणे चमत्कारिक ठरेल.‘विश्वास’ हा वाय-फायसारखा असतो. दृष्टीस पडत नाही, दिसत नाही, पण तो तुम्हाला जे पाहिजे आहे, त्याच्याशी जोडून देतो. विश्वास म्हणजे काय? एखादी व्यक्ती आपल्याला कधीही फसविणार नाही, आपले वाईट चिंतणार नाही, करणार नाही, आपल्याशी नेहमी प्रामाणिक असेलही त्या व्यक्तीविषयीची भावना म्हणजे ‘विश्वास’. ती व्यक्ती आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र-मैत्रीण, नातेवाईक कोणीही असू शकते. अगदी नोकरसुद्धा. आपल्याला असलेली एक वाईट सवय म्हणजे, घरातील एखादी अगदी क्षुल्लक वस्तू जरी सापडत नसेल तर ती नोकराने उचलली असेल, हा संशय मनात प्रथम येऊन जातो. ते बरेचदा खोटे ठरते. एका अतिश्रीमंत कुटुंबात सरूमावशी अठरा एकोणीस वर्षे काम करत होती. आपल्या चार वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन काम शोधणाऱ्या सरूला या कुटुंबाने काम दिले, थारा दिला. सुरुवातीला तिच्यावर प्रत्येक जण लक्ष ठेवून असायचा. अनोळखी बाई काय करेल याचा नेम नाही, हाच विचार असायचा. सरूची सरूमावशी झाली ती, इतके प्रेम तिने सर्वाना दिले. अंग मोडून काम केले. घर सर्व दृष्टीने सांभाळले. मालकांनी पण तिच्या मुलाला शिकवले. हळूहळू व्यवसाय शिकवला. सगळं काही छान सुरू असताना कपाटातील काही दागिने नाहीसे झाल्याचे घरातील सुनेच्या लक्षात आले. सरूमावशीची चौकशी झाली, पण तिने दागिन्यांना हात लावला नाही याची सर्वाना खात्री होती. कोणीही तिच्यावर अविश्वास दाखविला नाही. दागिने कोणी नेले असतील हे तिनेच घरच्यांना सांगितले. सगळे अवाक्झाले. तरी चोर सापडायलाच हवा होता म्हणून अचानक संशयित व्यक्तीची झडती घेतली. तिने खूप आकांडतांडव केले. ‘माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुमचा सरूवर आहे’ वगैरे बोलून रडारड केली. दागिने तिच्याकडे सापडले. ‘तुम्ही माझ्याबरोबर मुलाचे आयुष्य घडविले, तुमचा विश्वासघात मी जिवावर बेतले तरी करणार नाही,’ असे बोलून सरुमावशींनी सर्वाची मने परत एकदा जिंकली.

एका रोग्याचा डॉक्टरांवरचा विश्वास वेगळाच असतो. एका रुग्णाची शस्त्रक्रिया होती. महिनाभर उपचार झाल्यानंतर शस्त्रक्रियेकरिता फिट असलेला तो रोगी आयत्या वेळी ढेपाळला. त्याला नैराश्य आले. ‘ऑपरेशन करताना मी मरून जाईन’ असे म्हणू लागला. शल्यचिकित्सकाने त्याचा हात धरला. डोक्यावरून हात फिरवला. म्हणाले, ‘मी आहे. मनातील वाईट विचार काढून फेक.’ या एका वाक्याने जादू केली. रुग्ण म्हणाला, ‘मला या स्टेजपर्यंत यशस्वीपणे आणलंत, पुढे नक्कीच न्याल.’ रोगी ठणठणीत बरा झाला हे सांगायला नकोच!

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा