बल्लाळगड
इतिहास
केळवे माहिमचे मुळ नाव मत्स्यमत्, त्याचे पुढे झाले महकावती व नंतरच्या काळात माहिम. प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळूकेश्वरापर्यंतच्या (आजची मुंबई) समुद्र किनार्यावर आपले राज्य स्थापन करुन त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात बल्लाळगड किल्ला बांधण्यात आला असावा. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा परीसर घेतला तेंव्हा हा गडही त्याचा ताब्यात गेला असावा. पुढील काळात या भागावर रामनगरच्या कोळी राजांचे अधिपत्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७२ ते १६७७ याकाळात मोरोपंताना ६००० ची फौज देउन उत्तर कोकणात पाठवले. इ.स. १६७७ ला रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला प्रांत महाराजांच्या अधिपत्याखाली आला. त्याच काळात बल्लाळगड स्वराज्यात दाखल झाला असावा. इ.स. १६८३ पासून पुढील ६६ वर्ष हा किल्ला पोर्तुगिज आणि रामनगर यांच्याकडे होता. चिमाजी आप्पानी काढलेल्या वसई मोहिमेत इ.स. १७३९ मध्ये कृष्णाजी महादेव चासकर यानी सेगवागड जिकुन घेतला, तेंव्हा बल्लाळगड जिंकला असावा. पुन्हा इ.स. १७५४ मधे हा किल्ला रामनगरच्या कोळी राजाकडे गेला. इ.स. १८०२ मधे झालेल्या तहात सेगवा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स. १८१७ मधे गोगार्डच्या अधिपत्या खालील सैन्याने बल्लाळगड जिंकला.
महाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळ बल्लाळगड हे दोन किल्ले आहे. पालघर जिल्ह्यात आणि तलासरी तालुक्यात, मुंबई – अहमदाबाद महामार्गाला खेटुन बलाळगड किल्ला आहे. काजळी गावातील छोट्याश्या टेकडीवर बल्लाळगड हा टेहळणीचा किल्ला होता. या भागात असणार्या इतर किल्ल्यांच्या मानाने बल्लाळगडाची उंची पायथ्याच्या काजळी गावापासून कमी असल्याने अर्ध्या तासात किल्ला सहज पाहून होतो. सेगवा आणि बल्लाळगड हे दोनही किल्ले एका दिवसात पाहून होतात.काजळी गावात गोरखचिंचेचे अनेक अवाढव्य वृक्ष पाहायला मिळतात. पोर्तुगिजांनी भारतात आणलेली ही दिर्घायुष्यी झाडे वसई परीसरातील किल्ल्यांच्या आसपास दिसुन येतात.
पहाण्याची ठिकाणे
बल्लाळगडाच्या माथ्याच्या अलिकडे एका झाडाखाली एक वीरगळ ठेवलेली आहे. महाराष्ट्रात अनेक वीरगळ आहेत त्याहून ही वीरगळ वेगळी आहे. या वीरगळावर एक योध्दा घोड्यावर बसलेला दाखवलेला आहे. याचा घोडा काठेवाडी पध्दतीचा आहे. सुण्दर सजवलेला आहे. त्या वीरगळावर सूर्य चंद्र दाखवलेले आहेत