सामानगड किल्ला (Samangad Fort)
Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

सामानगड किल्ला

इतिहास
कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला व किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनीस अण्णाजी दत्तो यांचेकडे दिली. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.. या भागाची सबनिशी त्यांच्याकडे होती. सन १६८८ मध्ये सामानगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१पूर्वी हा गड पुन्हा मराठ्यांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. यानंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामानगडाने इंग्रजाविरुद्ध प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली.

सन १७०१ पूर्वी हा गड पुन्हा मराठय़ांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठय़ांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. यानंतर या किल्ल्याचे आधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामानगडाने इंग्रजाविरुद्ध प्रथम बंडाचे निशाण फडकवले.बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सनिक होते. या शिबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली.

पाहण्याची ठिकाणे
शिवशाहीचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाची साक्ष देणारा हा किल्ला अनेक र्वष उपेक्षित राहिला आहे. जेव्हा प्रतापराव बेहलोलखान या शत्रूवर सहा मावळ्यांना घेऊन तुटून पडले होते, त्याच्या आगोदर प्रतापरावांचा तळ याच सामानगडावर होता. या किल्ल्याचे असे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले असतानाही या किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून म्हणावा तितका विकास झालेला नाही. माजी आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून किल्ल्याचा बहुतेक विकास झाल्याचे आढळते.दुर्लक्षित असलेला पण निसर्गरम्य असा किल्ला पाहायचा असल्यास सुरुवातीला कोल्हापुरात यावे लागेल. पुणे-बंगळुरू महामार्गावरील संकेश्वर या गावावरूनही येथे जाता येते. गडिहग्लजवरून भडगाव चिंचेवाडी माग्रे आपण गडाच्या पठारावर पायउतार व्हायचे. चिंचेवाडी गावातील भल्या मोठय़ा विहिरीच्या बाजूला असलेल्या २ फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात.

डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते. तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते. डाव्या बाजूच्या सडकेने आपण गडावर प्रवेश करायचा. या ठिकाणी पूर्वी दरवाजा होता, परंतु तो काळाच्या ओघात नामशेष झालेला आहे. सामानगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढलेला आहे. त्यावर तटबंदी असून जागोजागी बुरूज बांधलेले आहेत.गडावरील डांबरी सडकेच्या डाव्या बाजूने आपण गडाच्या तटावर जायचे व तटावरूनच निशाण बुरुजाकडे जायचे. येथून पुढे उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपण जांभ्या दगडात खोदून काढलेल्या विहिरीवर पोहोचतो. विहिरीत उतरण्यासाठी पाय-या आहेत. विहीर चौकोनी आकाराची आहे.विहिरीजवळून पूर्व दिशेला गेल्यावर अंबाबाईचे कौलारू मंदिर लागते. मंदिराला लागून बुजलेली पाण्याची टाकी व अनेक चौथरे आहेत. अंबाबाई मंदिराच्या उजवीकडून पुढे गेल्यावर कमान बाव लागते. या विहिरीत उतरण्यासाठी पाय-या असून, पाय-यांवर सुंदर कमानी आहेत.

पाय-या संपल्यावर भुयार लागते, त्यापुढे पाणी लागते. या ठिकाणी सात कमानी आहेत. यापुढे आपणास जाता येत नाही. या ठिकाणी पूर्वी कैद्यांना ठेवले जात होते. अशा आणखी ३ विहिरी सामानगडावर आहेत. या वैशिष्यपूर्ण विहिरी हे सामानगडाचे भूषण आहे. कमान बाव पाहून आपण मंदिराच्या मागील पायवाटेने गडाच्या पिछाडीकडील तटावर जायचे. या तटावरून जाताना तटाच्या बाहेर आठ ते दहा फूट उंचीचे जांभ्या दगडाचे अनेक खांब आपणास दिसतात.त्याचे प्रयोजन अद्याप कळलेले नाही. पुढे आपणास चोर दरवाजा लागतो. येथून पूर्व दिशेला गडाचा आकार निमुळता होतो व शेवटी चिलखती सोंडय़ा बुरूज लागतो. सोंडय़ा बुरुजासमोर मुगल टेकटी दिसते. ती मुगल सन्याने गडावर हल्ला करण्यासाठी श्रमदानातून उभारली आहे, अशी अख्यायिका स्थानिक लोकांमध्ये आहे.गड पाहून झाल्यानंतर गडावरून सरळ जाणा-या सडकेने १५ मिनिटांत आपण मारुती मंदिर गाठायचे. या मंदिरासमोर कातळात कोरून काढलेली लेणी आहेत. या लेण्याच्या पाय-या उतरून आत गेल्यावर महादेव मंदिर दिसते. मंदिरात मोठे शिवलिंग व अनेक कमानीदार देवळ्या आहेत. येथून उतरणा-या डांबरी सडकेने पुढे गेल्यावर आपणास भीमशाप्पांची समाधी लागते, येथे स्वच्छ पाण्याचे कुंड आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3
, , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu