त्वचेचे सौंदर्य खुलविण्याचे नैसर्गिक उपाय

Like
Like Love Haha Wow Sad Angry

सौंदर्य हे मनात दडलेले असते. ते वस्तुत, व्यक्तीत अथवा पाहणाऱ्याच्या दृष्टीत नसते. ते प्रत्येक व्यक्तीच्या दृदयात असते असे श्री श्री रविशंकर म्हणतात. ते म्हणतात हे ह्रदयातील सौंदर्यच तुमच्या चेहऱ्यावरील तेजात परावर्तीत होते.आपण द्रव्य पदार्थ आणि चेतनेने बनलेले आहोत. अर्थात आपली त्वचा हे फक्त बाहेरील दृश्य आवरण नसून ती सजीव असते! ती शरीराच्या इतर अवयावांसाराखीच असते व तिची काळजी व निगा राखावी लागते. सौंदर्य खुलविण्याचे जितके उपाय उपलब्ध आहेत ते केवळ शारीरिक बाबींकडे लक्ष देतात पण ते शरीरातील प्रत्येक पेशी आतून कशी उजळेल आणि उर्जा व सौंदर्य कसे उत्सर्जित करेल याचे गुपित सांगत नाहीत.वाढत्या वयाबरोबर आपली त्वचा निस्तेज होत जाते. ताण, दुर्लक्ष आणि सुरकुत्या, काळी वर्तुळे, शुष्क चट्टे, पिटीका, थकवा आणि निस्तेजपणा चेह-यावर दिसू लागतो.तथापि असे अगदी साधे पण नैसर्गिक उपाय तजेलदार त्वचेसाठी आहेत की जे तुमची त्वचा नितळ आणि पुनरुज्जीवित करतात.
 
1. मूळ स्त्रोताकडे जा
प्राचीन आयुर्वेदात सौंदर्याचे गुपित सांगितले आहे. आयुर्वेदिक उटणी व लेप सौम्यपणे त्वचेचे पोषण करतात आणि तिला श्वास घ्यायला मोकळीक मिळते. त्यातही ती बनवण्यासाठी लागणारे घटक स्वयंपाकघरातच मिळतात.
तुमचा परिपूर्ण सौंदर्य लेप:
1.बेसन – २ चमचे
2.चंदन पावडर
3.हळद पावडर – अर्धा चमचा
4.कापूर – चिमुटभर
5.पाणी / गुलाबजल / दूध
बेसन, चंदन पावडर, हळद पावडर आणि कापूर यांचे पाणी अथवा गुलाबजल अथवा दूध वापरून थोडे घट्ट मिश्रण बनवा. ते एकसारखे तुमच्या चेहऱ्यावर लावा. २० मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुवून काढा. तुमचा अनुभव आणखी चांगल्या परिणामांसाठी कापसाच्या दोन पट्ट्या गुलाबपाण्यात भिजवून डोळ्यांवर ठेवा. तो आणखी सुधारावा असे वाटत असेल तर सौम्य वाद्यसंगीत ऐका. वीस मिनिटांनंतर काय घडते? तजेलदार त्वचा आणि शांत मन.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories