रक्तदान का करावे
Like
Like Love Haha Wow Sad Angry
11

रक्तदान का करावे
कधीकधी अचानक रक्तस्राव होतो. शस्त्रक्रिया,बाळंतपणातील अतिरक्तस्राव,अपघात, इ. प्रसंगात बाहेरून रक्त देण्याची गरज निर्माण होते. जास्त प्रमाणात रक्तपांढरी असेल तर रक्त भरावे लागते. रक्ताचा कर्करोग, सर्पदंशातील रक्तस्राव, इत्यादी प्रसंगीही रक्त द्यावे लागते. एखादा आटोक्यात न येणारा जंतुदोषही योग्यायोग्यविचार करून रक्त दिल्यावर आटोक्यात येऊ शकतो. हिमोफिलिया व थॅलसीमिया या आजारात वारंवार रक्त भरावे लागते. रक्तदान हे या दृष्टीने खरेच जीवदान आहे. रक्तदान करणारी व्यक्ती निरोगी असणे आवश्यक आहे. यासाठी रक्तद्रव्याचे प्रमाण निदान 10 ग्रॅम च्या वर असावे. तसेच गेल्या सहा महिन्यांत कावीळ किंवा विषमज्वर झालेला नसावा. एड्स व सांसर्गिक आजार नाही याची खात्री करावी लागते. मात्र तरीही एड्सचा धोका पूर्णपणे टळत नाही. यानंतर अशा व्यक्तीचे सुमारे 250 मि.ली. रक्त काढून घेतले जाते. लगेच गरज नसेल तर ते 4 सेंटीग्रेड तपमानात थंड ठेवले जाते. गरज पडेल तेव्हा हे रक्त शरीराच्या तपमानाच्या जवळआणून योग्य गटाच्या व्यक्तीला देण्यात येते.रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात फार भीती आहे. पण ही भीती पूर्णपणे अनाठायी आहे. शरीरातल्या एकूण रक्ताच्या फक्त पाच टक्के रक्त काढले जाते. शस्त्रक्रियेच्या वेळी बरेच नातेवाईक रक्तदानास घाबरतात. अपरिचित व्यक्तीकडून रक्तदानातून काही सांसर्गिक आजार पसरण्याची शक्यता असते.(कावीळ, एड्स, इ.) या धोक्यामुळे आता व्यावसायिक रक्तदात्यांकडून रक्त घेतले जात नाही. आता रक्तदान शिबिरातून रक्त गोळा केले जाते.चुकीच्या गटाचे रक्त भरले गेले तर रक्त गोठण्याची क्रिया चालू होऊन मृत्यू येण्याची शक्यता असते. अशा रुग्णाला सुरुवातीस थोडे रक्त गेल्यानंतर लगेच थंडी वाजणे,अस्वस्थता, मळमळ, उलटी,इत्यादी त्रास होतो. त्यानंतर छाती, कंबर यांत वेदना चालू होते. नाडी आणि श्वसनाचा वेग वाढतो. रक्तदाब कमी कमी होत जातो आणि रुग्ण दगावण्याची शक्यता असते. रुग्ण वाचला तर काही वेळाने कावीळ होते. लघवीत लालसरपणा उतरतो (रक्तद्रव्य). कदाचित मूत्रपिंडाचे कामकाज बंद पडू शकते. लवकर निदान झाले तर धोका टाळणे शक्य असते.

थँक्यू फॅार सेव्हिंग माय लाइफ : रक्तदाता सुखी भव:
आज १४ जून जागतिक रक्तदाता दिन. ऑस्ट्रेलियातील डॉ. कार्ल लॅडस्टेनर यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मानवी रक्तगटाचा शोध लावला, जागतिक आरोग्य संघटनेकडून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून जगात साजरा केला जातो. रक्‍तदात्यांप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा दिवस आहे. जे लोक ऐच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे असे या दिवसाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे.

द्रव्यदानं परम दानम् ।। अन्नदानं ततोधिकम् ।। ततः श्रेष्ठ रक्तदानम्
आज धकाधकीच्या बर्‍याच ठिकाणी छोट्या मोठ्या अपघातात ऑपरेशनच्या वेळी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे ओणि तो आपणासारखा सूज्ञ नागरिकच करू शकतो. आजच्या दिनी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यास मी रक्तदान करेन, असा संकल्प युवकांनी करावा.रक्तदान कोण करू शकते रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही. सुदृढ, सशक्त, रोग न झालेला माणूस रक्तदान करू शकतो. वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते. रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम करू शकतो. रक्तदातचे वजन 45 किलोच्या वर असावे. रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.​तुम्ही रक्तदान करण्यास पात्र आहात कि नाही? ते या गोष्टी सांगतील.रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान असते.आपले रक्त दान करून एखाद्याचा जीव वाचवण्याइतके पुण्याचे काम दुसरे कुठले नाही.आज जगात रोज लाखो लिटर रक्ताची रुग्णांसाठी आवश्यकता भासत असते.जर आपण यात काही मिली रक्त दान करून छोटेसे योगदान केले तर लाखमोलाचे ठरते.या आधीच्या लेखांमधून आपण रक्तदान करण्याचे फायदे तर बघितलेच आहेत.आपल्या प्रत्येकालाच आयुष्यात कधी न कधी रक्तदान करण्याची इच्छा होत असते त्यासाठी आपण कित्येक शिबिरे देखील घेत असतो.पण प्रत्येक व्यक्ती रक्त दान करू शकतोच असे नाही. रक्त दान करताना रक्तदात्यासाठी काही नियम बनविलेले असतात.जर तुम्ही त्या नियमांत पात्र असाल तरंच तुम्ही रक्त दान करू शकता. चला जाणून घेऊयात ते नियम.तुम्हाला जर रक्त दान करायची इच्छा असेल तर तुमचे वय १८ ते ६५ वर्षे दरम्यान असेल पाहिजे.जर तुमचे वजन ४५ किलो पेक्षा जास्त असेल तरच तुम्ही रक्तदान करण्यास पात्र आहात.तसेच तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी अर्थात हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ % पेक्षा जास्त असेल तरच तुम्ही रक्त दान करू शकता. जेवणानंतर आपल्या रक्तात साखर तयार होत असते त्यामुळे ज्या व्यक्तीला रक्तदान करायचे असेल त्या व्यक्तीला उपाशीपोटी रक्त दान करावे लागते.कारण एकदा का रक्तात साखर तयार झाली तर ते रक्त दान करण्यासाठी अयोग्य ठरते. चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक माणसाला दररोज आठ तास झोप घेणे आवश्यक असते.जर तुमची रक्त दान करण्याच्या अगोदर पूर्ण झोप झाली असेल तरच तुम्ही रक्तदान करू शकता. प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान एका वर्षातून तीन वेळाच करता येते त्यामुळे रक्तदात्याने पूर्वी केलेल्या रक्तदानास तीन महिने पूर्ण झालेलेअसलेच पाहिजेत.जर तुम्हाला रोज कोणत्याही आजारावरची औषधे चालू असतील तर तुम्ही कधीही रक्त दान करू शकत नाही.जर तुम्हाला कधी कावीळ झाली असेल तर तुम्ही रक्त दान करण्यास अपात्र आहात. रात्रीतून वारंवार घाम येणे,कारणाशिवाय वजनात घट होणे, कमी न होणारा ताप, जुलाब, ग्रंथीची सूज अशी लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तरी देखील तुम्ही रक्त दान करू शकत नाही.जेव्हा रक्तात अल्कोहोल मिसळते तेव्हा ते रक्त दूषित होते त्यामुळे रक्त दान करणाऱ्या व्यक्तीने रक्तदान करायच्या चोवीस तास आधी मद्यपान केलेले नसावे. जर तुम्ही रक्त दान करण्याच्या वर्षभर अगोदर कोणती लस घेतली असेल तरी तुम्ही रक्तदान करण्यास पात्र ठरत नाही.कर्करोग, ह्दयरोग, रक्तस्त्राव जन्य व्याधी, विनाकारण वजनात घट, क्षय, रक्ताच्या इतर व्याधी, दमा, फिट येणे, अपस्मार, महारोग,

मानसिक असंतुलन, ग्रंथीच्या व्याधी,संधिवात, रक्तदाब असे आजार जर तुम्हाला असतील तर तुमचे रक्त दुसऱ्या रुग्णाला देणे धोकादायक ठरू शकते.म्हणून असे आजार असणाऱ्या व्यक्ती रक्त दान करण्यास कायमस्वरूपी अपात्र असतात. जर तुमचे मूल एक वर्षांपेक्षा लहान मुलं असेल, गेल्या सहा महिन्यात तुमचा गर्भपात झाला असेल, जर तुमची मासिक पाळी चालू असेल, किंवा मासिक पाळी चालू होऊन पाच दिवस पूर्ण न झालेल्या स्त्रीया देखील रक्त दान करण्यास तात्पुरत्या अपात्सतात.रक्तदानाचे हे नियम नक्की वाचा आणि मगच रक्तदान करून एका जीवाला पून्हा जीवदान द्या.रक्तदानाचा जरा समोरच्या वक्तीला फायदा होतो तसाच फायदा रक्तदात्यालाही होतो. शरीरात नवीन रक्त तयार व्हायला मदत होते. रक्तदान करणाऱ्या व्यक्ती या इतरांपेक्षा जास्त स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात. पण रक्तदान करताना ठराविक गोष्टींची जर काळजी घेतली गेली नाही तर आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.रक्तदानाबद्दल अनेकांच्या मनात आजही अनेक शंका असतात. आज आम्ही तुमच्या याच शंकेचं निरसन करणार आहोत.रक्तदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय करावं याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. स्वस्थ पुरुष तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करु शकतो. तर स्वस्थ महिला चार महिन्यांतून एकदा रक्तदान करु शकतात. महिला आणि पुरुषांच्या रक्तदान करण्यामध्ये फरक असण्याचं मुख्य कारण म्हणजे दोघांच्या शरीराची जढण वेगळी आहे. मासिकपाळीमुळे महिलांच्या अंगातून महिन्यातून एकदा दुषित रक्त बाहेर पडत असतं. त्यामुळे त्यांनी शक्यतो चार महिन्यांतून एकदा रक्तदान करावे.

आजही अनेकांना असे वाटते की, रक्तदान केल्यामुळे हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. पण मुळात असे काही नसते. रक्तदान केल्यानंतर 21 दिवसांनंतर शरीरात नवीन रक्त तयार होतं. शरीरातील हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर अनेक आजार होऊ शकतात. सतत थकणं, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणं, चक्कर येणं, डोकं दुखणं अशा आजाराने माणूस त्रस्त होतो.एकावेळी कोणाच्याही शरीरातून 471 एमएलपेक्षा जास्त रक्त घेतले जात नाही. रक्तदान करण्याच्या एकदिवस आधी धुम्रपान करु नये. तसेच 48 तासांपूर्वी मद्यपान करु नये. जर मद्यपान केले असेल तर रक्तदान करु नये. रक्तदान केल्यानंतर दर तीन तासांनी भरपेट खाणं गरजेचं आहे. रक्तदान केल्यानंतर ज्यूस, चिप्स, फळं यांसारखा आहार करावा. शरीराला आवश्यक पदार्थ सातत्याने खालले नाही तर त्याचा परिणाम लगेच दिसू लागतो. तसेच रक्तदान केल्यानंतर पुढील 12 तासांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यायाम करु नये. अनेक सांसर्गिक आजारांचा (एड्स, कावीळ) थोडा का होईना धोका असल्याने नातेवाईक, मित्रमंडळी यांचेच रक्त देणे केव्हाही चांगले.सध्याच्या लोकसंख्येच्या २ टक्के प्रमाणात जरी इच्छेने रक्तदान केले तर रक्तपेढीत कधीच रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही किंवा रक्ताच्या एका थेंबावाचून कुणाचे प्राण जाणार नाहीत. मानवाने आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कितीही प्रगती केली तरी कृत्रिमपणे रक्त तयार करता येत नाही. मानवाला फक्त मानवाचेच रक्त चालते, म्हणून रक्तदान ही अमूल्य सेवा आहे.रक्तदान श्रेष्ठदान असे म्हटल जाते. कारण तुमच्या रक्तदानाने कुठल्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकते.आजकाल ऐच्छिक रक्तदानाने वाढदिवस साजरा करण्याची जीवनशैली बरेचसे युवक अंगीकार करीत आहेत. मित्रमंडळीसमवेत शासकीय रक्तपेढीत जावून रक्तदानाने म्हणजेच जीवनदान देवून वाढदिवस साजरा होत आहे. रक्तपेढीत ‘बर्थ डे डोनर्स क्लब’ची संकल्पना रुजवत आहे. अनेक जण विचार करतात की आम्ही रक्तदान का करावे, त्याने आम्हाला काय फायदा होणार? रक्तदानाचे फायदे पाहता तुम्ही स्वतःहून नियमितपणे रक्तदान कराल. रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो नियमित स्वरुपात रक्तदान केल्यास अतिरिक्त लोह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.त्यामुळे शरीरातील आर्टरी ब्लॉकेज कमी होतो. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका ८८ टक्क्यांनी कमी होऊन जातो. नियमित रक्तदान करणारे लोक खूप कमी प्रमाणात दवाखान्यात भर्ती होत असतात. राक्तदात्याला हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता फार कमी असते.

जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर ते तुम्ही रक्तदान करून देखील करू शकता.रक्तदान हे फिट राहण्यासाठी एक योग्य आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एका वेळी रक्तदान केल्याने शरीरातील ६५० कॅलरीज कमी होतात, त्यामुळे जर तुम्ही दर तीन महिन्याला रक्तदान केले तर तुमच्या किती कॅलरीज कमी होतील पहा.रक्तदानामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटण्यासही मदत होऊ शकते. शरीरात लाल रक्तपेशींचा स्तर योग्य प्रमाणात येण्यासही मदत होते. यादरम्यान, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम करुन वजन नियंत्रण आणले जाऊ शकते. पण म्हणून वजन कमी करण्यासाठी रक्तदान करणे हा योग्य मार्ग ठरू शकत नाही. रक्तदानाची प्रक्रिया केवळ निरोगी आरोग्य राखण्याचे माध्यम आहे, वजन घटवण्याच्या योजनेतील हिस्सा नाही. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,रक्तदानाआधी तुमचे चेक-अप केल्या जाते. ज्यामध्ये तुमच्या शरीराचे तापमान, पल्स रेत, ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन इत्यादीची तपासणी केली जाते. त्यानंतर रक्त टेस्ट साठी पाठवले जाते, ज्यामध्ये तुमच्या रक्तावर १३ वेगेवेगळे टेस्ट केले जातात. त्यामुळे जर तुम्हाला कुठला आजार झाला असेल, किंवा तुमच्या शरीरात कशाची कमी असेल तर ते तुम्हाला लगेचच कळत ई तेही फ्री.आपल्या शरीरात ५ ग्राम एवढे Iron असते. Iron जास्तकरून रेड ब्लड सेल्स आणि बोन मॅरोमध्ये असते. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा १/४ एवढे Iron निघून जाते. पण ह्या Iron ची कमतरता एका आठवड्यात तुमच्या जेवणातून भरून निघते. त्यामुळे शरीरातील Iron चे संतुलन बनून राहते. तसेही शरीरात जास्त Iron ब्लड वेसल्स साठी हानिकारक असते.एका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. रक्तदान प्रक्रियेमध्ये रक्तदानापूर्वी तुमचे रक्त आणि आरोग्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी तपासली जाते, संसर्ग, आजारांची तपासणी केली जाते. रक्तचाचणीद्वारे एखादी व्यक्ती रक्तदान करण्यास सक्षम आहे की नाही, याची माहिती मिळते.मग आता जर आपले रक्त दान केल्याने इतरांना तसेच आपल्यालाही फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
11
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu