चीज मसाला सँडविच- Recipes Marathi
साहित्य – 2 ब्रेड स्लाइस,1 काकडी,1 बटाटा उकडून,1 टोमॅटो,1 कांदा,1 चीझ स्लाइस,1 छोटी वाटी एग्लेस मायो सॉस ,1 स्लाइस उकडलेले बीट,1 टेबलस्पून चाट मसाला,२ चमचे बटर,चवीनुसार मीठ
कृती -: सर्वप्रथम उकडलेला बटाटा स्मॅश करून गॅस वर एका पॅनमध्ये बटाटा,तिखट, हळद चवीनुसार मीठ घालून बटाट्याचे मिश्रण तयार करून पाच ते सात मिनिटे शिजवून घ्यावे.त्यानंतर एक वाटी मेयोनिज घेऊन त्यामध्ये एक स्लाइस उकडलेला बीट किसून घालावा हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे.सॅंडविच साठी पुदिन्याची चटणी ही करून घ्यावी.ब्रेड स्लाइस च्या कडा कापून घ्याव्यात.त्यानंतर त्यावर बटर,पुदिना चटणी ,२-३ कांदा स्लाइस ,चीज स्लाइस ,बटाटा मिश्रण ,२-३ टोमॅटो स्लाइस मेयोनिज बीट मिश्रण ,२-३ काकडी स्लाइस या क्रमाने लेयर करून घ्यावे प्रत्येक लेयर नंतर चाट मसाला आणि मीठ भुरभुरावे.ब्रेड च्या दुसऱ्या स्लाइस ला सुद्धा बटर लावून तो तयार सँडविच वर ठेवावा.तयार सँडविच पुदिना चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.