उमलण्याआधी मुलगी
एक मुलगी ही जन्मापासून ते बालपण आणि पौगंडावस्थेत जन्मलेली स्त्री आहे जेंव्हा ती एक स्त्री बनते तेंव्हा प्रौढपणाची प्राप्ती होते. मुलगी ही एक तरुण स्त्री आहे असे म्हटले जाऊ शकते, आणि ती बहुधा मुलगीसाठी समानार्थी शब्द म्हणून वापरली जाते. कोणत्याही समाजात मुलींचे उपचार आणि स्थिती सहसा त्या संस्कृतीच्या स्त्रियांच्या स्थितीशी निगडीत आहे. एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना. त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि त्या आईलाच एक पत्र लिहिलं उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या “राधा जोगळेकर” यांनी. सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत ईमेल करून पोचवा. हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी “सार्थक” झाले असे मी समजेन हे पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही चुकल्यास क्षमा असावी. आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. आई, असं का ग केलंस? का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस? मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस. तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त तुझ्याचमुळे ग. आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस. आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल. तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, ‘आई भाऊ नाही. राजाभाईची छोटी बहिण येणार आहे. तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही. भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात असूनही मी त्याला हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने ढकलत असे. मला लागायचं. तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच असते कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, ‘हे माँ, माझ्या मुलांना सुखी ठेव. ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली आहे. मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, “माँ” आहे, जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते. माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा, तुला बघण्याचा! एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला. मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या आईला बघण्यासाठी मला अजून सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून स्त्री-पुरुषाने एकत्र येण्याचं, कुटुंबसंस्था विकसित होण्याचं मुख्य प्रयोजन त्यांच्या शारीरिक गरजा समाजमान्यतेने, सनदशीर मार्गाने पूर्ण करणे एवढेच नसून, पुढची पिढी घडविणे, त्यासाठी योग्य,
उमलण्याआधी मुलगी कविता
ए आई ए आई ,मला जगात येऊ दे ,हे सुंदर सुंदर जग मला डोळ्याने पाहू दे ,या आजी आजोबांना ,का कळत नाही मी मुलगी असली तरी ,मुलांपेक्षा कमी नाही ,हे त्यांनाही आता थोडं थोडं कळू दे ,ए आई…..मुलगा मुलगी भेद ,का सारे करतात मुलाला उजवा अन् ,मुलगी डावी मानतात मुलींनाही आता ,पुढं पुढं जावू दे ,ए आई….. उडण्याआधीच माझे ,पंख कापू नका ,थोडा विश्वास ठेवा मी देणार नाही धोका ,मलाही आकाशात उंच उंच जाऊ दे ए आई…
कौटुंबिक पार्श्वभूमी तयार करणे, जबाबदारी वाटून घेणे, मुलांच्या निकोप वाढीसाठी कुटुंबात आपांपसांत प्रेम, विश्वास, साहचर्य वाढवणे असे आहे. मूल जन्माला घालताना जोडप्याला नक्कीच माहिती असते की जन्माला येणारं मूल हे मुलगा किंवा मुलगी असणार मग यानंतर सोनोग्राफी करुन मुलगा आहे की मुलगी हे तपासण्याचं खर तर कारण नसतच.पण इथचं समाजाची स्वार्थी मानसिकता आडवी येते. मुलगा म्हातारपणी सांभाळणार हा पराकोटीचा स्वार्थ खर तर मुलगा हवा असण्याचे हे मुख्य कारण आज निरर्थक ठरत आहे पण तरीही मोठ्या आशेने मुलाची आशा प्रत्येक जोडपे बाळगते. एकदा मुलगा झाला की सुटलो पुन्हा पराकोटीच्या स्वार्थाची इच्छा म्हणजे मुलींना जन्म ज्याला हुंडा देण्याची ऐपत आहे त्यांनी द्यावा आम्हांला काय आमची म्हातारपणाची चिंता मिटली आमची सांपत्तीक स्थिती मुलीला हुंडा देण्याइतपत नाही खरतर कायद्याने हुंडा देणे/घेणे अवैध आहे या पासुन ही तपासणीची कारणे सुरु होतात तर अगदी सासुला-सास-यांना मुलगाच हवा..मुलगी आवडत नाही या सारख्या कारणांमुळे या गर्भलिंग तपासण्या केल्या जातात. या तपासण्या करण्याला खरतर स्त्री विरोध करु शकते.नवरा विरोध करु शकतो.अगदी ज्याला या बद्दल माहिती आहे असे नातेवाईकही हा विरोध करुन यांस रोखु शकतात, पण समाजाची मला काय त्याचे? अशी स्वार्थाकडे झुकणारी मानसिकता असं काही रोखणे दूर उलट या गोष्टींना उत्तेजनच देत असते. हे गर्भलिंग साधारणपणे ज्या कालावधीत समजू शकते त्या वेळपर्यंत पोटातील बाळाची बरीचशी वाढ झालेली असते. आणि त्यानंतर हा गर्भ काढून टाकल्यामुळे मातेच्या प्रकृतीवर ही विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. ब-याच मातांचे मृत्युही झालेले आहेत. अश्या गर्भपातांनंतर या गर्भांचे काय केले जाते हे पाहण्याची तसदीही कोणी घेत नाही. भावना असते ती फक्त मोकळं झाल्याची खुशी. हा अमानुषपणा का केला जात आहे? जर मूल नको तर किती तरी उपाय असताना मुलगा होण्यासाठी मुलगा होई पर्यंत अश्या प्रकारे मुलींचा गर्भ खुडणे हा त्या स्त्री-पुरुषाचा/ पति-पत्नीचा अमानुषपणांच नाही का? जे आप्त आपल्या घरात या प्रकारांना विरोध करत नाहीत ते यांत सामील आहेत असं का समजु नये? कोण आहेत हे अमानवीय लोक जे मानवी समाजाला चुड लावण्याचे काम समाजात उजळ माथ्याने राहुन करत आहेत? आपली आई, बहिण या स्त्रिया असूनही, स्वत: एक स्त्री असून पुरुषांना-स्त्रियांना मुलींचा गर्भ खुडण्याची ही अघोरी बुध्दी का होतं असते? त्या साठी ते बेकायदेशीर वागतात, स्वत:चा जीव पणाला लावतात.
अश्या डॉक्टरांचे खिसे भरतात हा त्यांचा अपराध नाही का?समाजातले स्त्रीयांचे प्रमाण कमी होत असुन पुढे मुलांना लग्न करण्यासाठी मुली मिळणार नाही ज्या मुली असतील त्यांना समाजात धोका निर्माण होईल बालिकांना, मुली-महिलांना अश्या परिस्थितीत घराबाहेर पडणे मुश्किल होईल सामाजिक असमतोल निर्माण होईल लैंगिक समस्यांचा आगडोंब उसळेल हा विचार त्यांना छळत नाही का? समाजमान्यतेच्या नावाखाली स्वत:चा व्यक्तिगत स्वार्थ किती दिवस साधणार आहेत हे एक मुलगी जेंव्हा घरात जन्म घेते ते सुख, ते आनंदाचे क्षण खरंतरं कसे असते हे त्यांना अनुभवायचेच नसते का? हल्ली तर मुलगी मुलगा यांत फरकही राहिलेला नाही मुलांची सर्व क्षेत्रे मुलींनीही समर्थपणे काबिज केली आहेत मुलीही त्यांच्या पालकांची मुलासारखीच काळजी घेताना दिसतात. मग तरीही का असतात ते इतके करंटे की या सुखाला लाथाडून मोकळे होतात? का नाही विरोध करत या असल्या अमानुषतेला आज सुदाम मुंडे सारख्या डॉक्टरांबद्दल आपण बोलतो तेंव्हा त्यांचा गुन्हा मोठा आहे कबूल..पण त्यांना दोष देउन समाजघटक म्हणुन आपली जबाबदारी संपते का? समाजघटक म्हणुन काही जबाबदा-या आपल्या नाहीत का? हे जग बदलण्यासाठी, ते सुंदर करण्यासाठी आधी स्वत:पासून सुरुवात करायल हवी आहे ‘कायदा महत्त्वाचा आहेच. पण त्याहून महत्त्वाचं आहे ते बदल घडवणं
आपण ह्या बदलासाठी तयार आहोत ना हुंड्यासारख्या घातक समाजप्रथेमुळे सर्वाधिक स्त्रीभ्रुण हत्या होताहेत म्हणुन हुंडा देणा-या व घेणा-यांविरुध्द कडक भूमिका आपण घेणार आहोत ना. आपल्या घरात, आजुबाजुला अश्या घटना होतात किंवा होउ पाहतात तेंव्हा कायदयाची उपलब्ध मदत आपण घ्यायला हवी आहे ना आज समाजाला स्त्रीभ्रुण हत्ये सारख्या अतिशय संवेदनशील विषयावर ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे या साठी आपल्याला जनमत तयार करता येऊ शकते ना तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करता ना बहिणी ला जीव लावता ना तुमची पत्नी-सहचारिणी तुम्हांला प्रिय आहे ना मग मुलगीच का नको भावी समाजाला आई, बहिण, सहचारिणी हव्या आहेत…म्हणुन ’मुली’ या हव्यातच मग का नाही आपण एक जबाबदार नागरिक म्हणुन स्त्री भ्रुण हत्ये विरोधासाठी कृतीशील चळवळ उभारण्यासाठी तयार होत मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात. रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग तू पप्पांना गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती काळजी वाटते, हे पाहून मला किती बर वाटल होत. दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,तेव्हा मला
खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले, “मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही.” थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पप्पा नावाचा माणूस म्हणाला,”सर, अबोर्शन करा “डॉक्टर म्हणाले “उद्या सकाळी या.” मी पोटामध्ये खिदळत होते. दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे जाऊन सुखरूप घरी येऊ दे.” मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मोठ्या आईला म्हणाले, की माझ्या आईला लवकर बर कर नंतर नंतरच तुला माहीतच आहे आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून. मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला. आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत जायचं आहे. राजाभाईसारखा ” हेप्पी बर्थ डे” करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे. आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग..आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण ‘झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ..मग कशाला घाबरतेस. आई एकदाच फक्त एकदाच समाधानात तडजोड असते फक्त जरा समजून घे. ‘नातं ‘ म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.