साहित्य – ½ किलो बोनलेस चिकन, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट. लिंबाचा रस, दही, कसुरी मेथी.
कृती -: एका भांड्यात चिकन घेऊन त्यात आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, तिखट घालून छान एकजीव करुन घ्या. आणि साधारण 15 मिनिटे तरी ठेवून द्या.दुसऱ्या मॅरिनेशनसाठी तुम्हाला दही, आलं-लसूण पेस्ट आणि लाल तिखट हळद, गरम मसाला एकत्र करायचा आहे. थोडीशी कसुरी मेथीही यामध्ये घालायची आहे. दह्याचे मिश्रण एकत्र करुन त्यामध्ये थोडे तेल घालायचे आहे.दही तेलाचे हे मिश्रण तुम्ही छान फेटून घ्यायचे आहे. मायक्रोव्हेवमध्ये एका भांड्यात तेल घेऊन त्यात जीरे आणि बेसन घेऊन ते 1 मिनिटांसाठी किंवा बेसनचा छान वास येईपर्यंत ठेवायचे आहे. तयार दह्याच्या मिश्रणात तुम्हाला हे घालायचे आहे. त्यामुळे तुमच्या चिकन टिक्काला एक छान कोट मिळतो.आता या मिश्रणात चिकन घालून छान एकत्र करायचे आहे. आता मायक्रोव्हमध्ये मिळणारी जाळी घेऊन त्यावर चिकनचे एक एक पीस तुम्हाला ठेवायचे आहे. मायक्रोव्हेव 200 डिग्रीवर प्रीहिट करुन तुम्ही छान 20 मिनिटे बेक करा.
टिप : तुम्ही बेकिंग नंतर ग्रील्ड सुद्धा करु शकता. त्यामुळे तुम्हाला छान क्रिस्प येईल.