चिकन ग्रील्ड- Non Veg Recipes Marathi
साहित्य – साधारण 1 किलो चिकन, आलं – लसूण पेस्ट, लाल तिखट, लिंबाचा रस, हळद, गरम मसाला, धणे पूड.
कृती -: चिकनचे पीस मोठे ठेवा. त्याला लांब लाबं चिरा पाडून घ्या.चिकनमध्ये सगळे मसाले घालून छान मॅरिनेट करुन ठेवा. तुम्हाला जर लाल रंग हवा असेल तर तुम्ही लाल रंगही घालू शकता.बेकिंग ट्रेला थोडेसे तेल घालून तुम्ही त्यावर थोडे लांब लांब चिकन ठेवा.180 डिग्रीवर 20 मिनिटे तुम्हाला चिकन ग्रील्ड करायचे आहे. दहा मिनिटांनी तुम्हाला चिकन उलटून दुसऱ्या बाजूने शिजवायचे आहे.तुमचे ग्रील्ड चिकन तयार.
टिप: ग्रील्डमोडचा वापर करताना तुम्हाला टॉल जाळीचा उपयोग करायचा आहे त्यामुळे चिकनची वरील बाजू छान ग्रील्ड दिसेल.