चिकन पॉपकॉर्न ही सगळ्यांचीच आवडती रेसिपी आहे. खूप जणांना फ्राईड चिकन पॉपकॉर्न आवडतात.पण तुम्ही कधी मायक्रोव्हेवमधील चिकन पॉपकॉर्न खाल्ले आहेत का? मग ही रेसिपी नक्की करा.
चिकन पॉपकार्न- Non Veg Recipes Marathi
साहित्य – 500 ग्रॅम बोनलेस चिकन, हळद, लाल तिखट, काळीमिरी पूड, बडिशेपेची पूड, मीठ, आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस.
कृती -: सगळे साहित्य एकत्र करुन घ्या. चिकन छान मॅरिनेट होऊन द्या.एक तासानंतर चिकन छान मसाल्यामध्ये घोळलेले दिसेल.मायक्रोव्हेव सात मिनिटांसाठी प्रीहिट होऊ द्या. चिकन एका प्लेटमध्ये घेऊन मायक्रोव्हेव कन्व्हेशन मोडवर 180 डिग्रीवर 20 मिनिटांसाठी बेक्ड करा.दहा मिनिटांनी त्याची बाजू बदला. आता मायक्रोव्हेवचा मोड बदलून ग्रील्ड करा आणि 10 मिनिटांसाठी छान फ्राय करा. मस्त क्रिस्पी फ्राईड चिकन तयार.
टिप: तुम्ही चिकन आणि क्रिस्पी करण्यासाठी कॉर्नफ्लेक्सचाही उपयोग करु शकता.
1 Comment. Leave new
मला तुमच्याशी संपर्क करायचा आहे. परंतु कसा करायचा कळत नाही आहे.
त्यामुळे कृपया तुम्ही मला माझ्या Email वर reply द्या.